शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डी पालिकेत राष्ट्रवादी युवकचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 17:16 IST

शहरात गेल्या सहा महिन्या पूर्वी दीड कोटी रूपये खर्चुन पाथर्डी नगरपालिकेने बसविलेल्या एलईडी पथदिव्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरूवारी पालिकेवर मोर्चा नेण्यात आला. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देएलईडी पथदिवे : भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करण्याची मागणी

पाथर्डी : शहरात गेल्या सहा महिन्या पूर्वी दीड कोटी रूपये खर्चुन पाथर्डी नगरपालिकेने बसविलेल्या एलईडी पथदिव्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने  पालिकेवर मोर्चा नेण्यात आला. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले.एलईडी पथदिवे बसविण्यासाठी १ कोटी ५१ लाख रूपये मंजूर झाले आहेत. त्यातून नगरपालिकेने ४५० पथदिवे बसविले आहेत. यातील काही पथदिव्याची किंमत २७ हजार ५०० रूपये तर काही दिव्यांची ३४ हजार ५०० रूपये दोन वेगळे खर्च दाखविले आहेत. काही पथदिवे बंद पडले आहेत. याबाबत मुख्याधिकाºयांनी चौकशी समिती नेमली. परंतु चौकशी समितीवर ठेकेदारच असल्याचे यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी नगराध्यक्ष व मुख्याधिकाºयांच्या अनुपस्थितीत नायब तहसीलदार पंकज नेवसे यांनी येत्या १० दिवसात चौकशी करण्याचे आश्वासन आंदोलकाना दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय रक्ताटे, बबनराव सबलस,पांडुरंग हंडाळ, जुनेर पठाण,लालभाई शेख,विवेक देशमुख,राजेंद्र नांगरे,संतोष वाघमारे,किशोरजी डांगे, शेखर चितळे, किशोर परदेशी,आकाश वारे,आदी जण उपस्थित होते.मुख्याधिकारी, नगराध्यक्ष गैरहजरयेत्या १० दिवसात पथदिवे गैरव्यवहाराची चौकशी झाली नाही तर, तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा प्रतिक खेडकर यांनी दिला आहे. यावेळी आंदोलकांनी नगरपालिकेचे दालन घोषणाबाजींनी दणाणून सोडले. यावेळी मुख्याधिकारी वसुधा कुरणावळ तसेच नगराध्यक्ष उपस्थित नव्हते.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी