शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

‘नाथ माझा’ नाटकातच निवडला ‘कलायात्रिकां’नी जीवनसाथी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 16:30 IST

१९८५ साल़ आई-वडिलांनी निवडलेल्या व्यक्तीशीच विवाह करण्याचा दंडक़ प्रेमविवाह तर जवळपास निषिद्धच होता. मात्र, शिरीष आणि सुजाता जोशी यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला. दृष्ट लागावा असा संसार उभा केला.

व्हॅलेंटाईन-डे स्पेशल १९८५ साल़ आई-वडिलांनी निवडलेल्या व्यक्तीशीच विवाह करण्याचा दंडक़ प्रेमविवाह तर जवळपास निषिद्धच होता. मात्र, शिरीष आणि सुजाता जोशी यांनी आंतरजातीय प्रेमविवाह केला. दृष्ट लागावा असा संसार उभा केला. त्यांच्या संसारवेलीवर एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन फुले उमलली़ मुला-मुलीला उच्चशिक्षित केले. त्यांनी आता सुखी संसाराची चौतीशी पार केली आहे. दोघेही आता निवृत्त जीवनाचा आनंद लुटत आहेत. शिरीष अनिल जोशी हे १९७८ साली अर्बन बँकेत नोकरीला रूजू झाले. कॉलेज जीवनापासून त्यांना नाटकांची आवड होती.त्यामुळे बँकेत काम करीत असतानाही ते विविध नाटकांचे प्रयोग करीत होते. १९८५ साली कलायात्रिक या नाट्य संस्थेसाठी निधी उभा करायचा म्हणून गणेशोत्सवात जोशी नाटकांचे प्रयोग करीत़ ‘नाथ माझा’ या नाटकात एका मध्यवर्ती भूमिकेत एक मुलगी काम करायची़ उत्तम अभिनय़ दिसायलाही देखणी़ त्या मुलीचं नाव सुजाता सूर्यकांत शिंदे़.या मुलीवर शिरीष जोशी यांचे मन जडले. त्यांनी सुजाता यांना थेट लग्नाची मागणी घातली. त्यांनीही क्षणाचा विलंब न करता होकार कळविला. सुजाता यांचे आई-वडील दोघेही डॉक्टर. सुजाता यांच्या वडिलांचे १९८२ साली निधन झाले होते. तर शिरीष जोशी यांचे वडील अनिल नारायण जोशी हे बँकेत होते. शिंदे-जोशी दोन्ही कुटुंबीय सुशिक्षित़ मुलांवरही उत्तम संस्कार केलेले. त्यामुळे सुजाता-शिरीष यांच्या विवाहाला कोणीही अडथळा आणला नाही. १९८६ साली दोघांचा थाटामाटात विवाह झाला. शिरीष जोशी आता बँकेतून निवृत्त झाले आहेत. ३४ वर्षाच्या संसाराच्या गुलाबी आठवणी सांगताना ते म्हणातात, आम्ही नोंदणी पद्धतीने लग्न केले. आम्हाला एक मुलगी, एक मुलगा आहे. दोघेही उच्चशिक्षित आहेत़ मुलाने ‘एम.कॉम., जीडीसी अ‍ॅण्ड ए’ तर मुलीने ‘एमसीएम’ पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यावेळी प्रेमविवाह करणे तसे अवघड होते. परंतु आमचे दोघांचेही कुटुंब सुशिक्षित आणि संस्कारी होते. त्यामुळे दोन्ही कुटुंबाने आम्हाला स्वीकारले़ प्रेमात राग, लोभ, रुसवा असं सगळं असतं़ त्यातूनच प्रेमाला अधिक गोडी येते़’-शिरीष -सुजाता जोशी, अहमदनगर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट