शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

नगरचा गणेशोत्सव डीजेमुक्तीकडे

By admin | Updated: August 10, 2014 23:29 IST

अहमदनगर : गणेशोत्सवात आणि विसर्जन मिरवणुकीतही डीजे न लावता पारंपरिक वाद्ये वाजविण्याबाबत शहरातील १३ पैकी ११ मंडळांनी तयारी दर्शविली आहे.

अहमदनगर : गणेशोत्सवात आणि विसर्जन मिरवणुकीतही डीजे न लावता पारंपरिक वाद्ये वाजविण्याबाबत शहरातील १३ पैकी ११ मंडळांनी तयारी दर्शविली आहे. मात्र पहिल्या ११ मंडळांनी डीजेमुक्त उत्सव साजरा करण्याबाबत प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. शिवसेनेच्या मंडळाने प्रतिज्ञापत्र देण्यास नकार दर्शविला आहे. मानाच्या मंडळांनी डीजे न लावण्याचा निर्णय घेतल्याने नगरचा उत्सव यंदा डीजेमुक्त होण्याची शक्यता आहे.डीजे लावल्याने शारीरिक, मानसिक होणारा त्रास, त्याचे परिणाम, ध्वनिप्रदूषणाचे दुष्परिणाम याबाबत तज्ज्ञ, पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते जागर करीत आहेत. मात्र त्यापासून गणेश मंडळे बोध घेत नसल्याने दरवर्षी डीजे दणदणाट दरवर्षीपेक्षा जास्त होतो. तसेच मंडळांमध्ये डीजे वाजवून तरुणांची गर्दी जमविण्याची स्पर्धा होते. कपिलेश्वर मंडळाचे अध्यक्ष कैलास गिरवले यांनी गेल्या दोन वर्षांपासून डीजेमुक्तीसाठी पुढाकार घेत आहेत. त्यांच्या मंडळाने गतवर्षी पारंपरिक वाद्ये वाजविण्यावर भर दिला होता.शहरात पूर्वी मानाचे १५ मंडळे होती. त्यापैकी स्पंदन आणि आझाद ही मंडळे मिरवणुकीतून बाद करण्यात आली. राहिलेल्या तेरा मंडळांपैकी ११ मंडळांनी डीजे न लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गिरवले यांच्या पुढाकाराने ११ मंडळांनी प्रतिज्ञापत्रावर सह्या केल्या आहेत. संभाजी कदम यांच्या बंधुंचे समझौता तरुण मंडळ आणि शेवटचे असलेले शिवसेना मंडळ यांनी मात्र प्रतिज्ञापत्रावर सही करण्यास नकार दिल्याचे समजते. त्यामुळे डीजेमुक्तीला शिवसेनेचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.(प्रतिनिधी)कोतवाली पोलीस ठाण्यात झालेल्या बैठकीनंतर बारा मंडळांनी डीजे न लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी शिवसेनेची दोन मंडळे वगळता सर्व ११ मंडळांनी डीजे न लावण्याबाबतच्या प्रतिज्ञापत्रावर सह्या केल्या आहेत. सामान्य लोकांच्या आरोग्याचा विचार न करता डीजे लावून तरुणांची गर्दी जमवायची, यासाठी डीजे लावण्याचा शिवसेनेचा आटापिटा आहे. लोकांच्या आरोग्याचा विचार करूनच डीजे बंद करण्याचा निर्णय आहे. कपिलेश्वर मंडळ दोन वर्षांपासून डीजे वाजवित नाही. या उपक्रमाला सर्वांचेच सहकार्य अपेक्षित आहे.-कैलास गिरवले, कपिलेश्वर गणेश मंडळध्वनी प्रदूषणाचे परिणाम घातक आहेत. माणसाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. डीजेच्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू येणे, कर्णबधिरता येणे आदी प्रकारचे आजार जडतात. याशिवाय तरुणांची व्यसनाधिनता वाढीसही डीजेमुळे प्रोत्साहन मिळते. त्यासाठी यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याला शहरातील मंडळे चांगला प्रतिसाद देत आहेत, ही चांगली बाब आहे.-वाय.डी. पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारीआज निर्णयसर्वच मंडळांच्या प्रमुखांची रविवारी रात्री साडेनऊ वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. सोमवारी सकाळी सामुहिकपणे डीजे न लावण्याचा निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे.याबाबत पोलीस प्रमुखांनाही मंडळाचे पदाधिकारी भेटून निवेदन देणार असल्याचे समजते. याबाबत कैलास गिरवले यांनीही दुजोरा दिला.डीजे न लावण्याचा निर्णय त्यांच्या मंडळांनी वैयक्तिकपणे घेतला आहे. याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. प्रत्येक मंडळाने काय देखावे साजरे करायचे, मिरवणुकीत डीजेबाबतचा निर्णय मंडळांचा वैयक्तिक आहे. -संभाजी कदम, शिवसेना शहर प्रमुख