शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

नागवडे, काकडे, झावरे, कार्ले यांची माघार; परजणे, वहाडणे मैदानात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 16:59 IST

कोपरगामध्ये भाजपाचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. याशिवाय भाजपाचे विजय वहाडणे यांनी अर्ज ठेवल्याने कोपरगावमध्ये चौरंगी लढत होणार आहे. श्रीगोंद्यातून काँग्रेसच्या अनुराधा नागवडे, पारनेरमधून सेनेचे जिल्हा परिषद संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, आणि पाथर्डीतून हर्षदा काकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे  घेतले आहेत.

अहमदनगर : कोपरगामध्ये भाजपाचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवत निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली आहे. याशिवाय भाजपाचे विजय वहाडणे यांनी अर्ज ठेवल्याने कोपरगावमध्ये चौरंगी लढत होणार आहे. श्रीगोंद्यातून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती अनुराधा नागवडे, पारनेरमधून सेनेचे जिल्हा परिषद संदेश कार्ले, राष्ट्रवादीचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, आणि पाथर्डीतून हर्षदा काकडे यांनी उमेदवारी अर्ज मागे  घेतले आहेत.विधानसभा निवडणुकीत युती व आघाडीने दिलेल्या उमेदवारांवर नाराज असलेल्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. युतीच्या जागा वाटपात श्रीगोंदा मतदारसंघ भाजपकडे आहे. भाजपाने तिथे माजीमंत्री पाचपुते यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या अनुराधा नागवडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. खासदार सुजय विखे  हे नागवडे यांच्या माघारीसाठी प्रयत्नशील होते. नागवडे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी सोमवारी अर्ज मागे घेतला. सेनेचे पारनेरमध्ये आमदार विजय औटी यांना उमेदवारी बहाल केली आहे. तेथे सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. तो त्यांनी मागे घेतला. याशिवाय पारनेरमधून राष्ट्रवादीत नाराज असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी अर्ज दाखल केला होता. झावरे यांनी विखे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे जाहीर केले आहे. पारनेरमध्ये कार्ले, झावरे आणि माधवराव लामखेडे यांनी तिसरी आघाडी उभी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, कार्ले व झावरे यांनी औटी यांच्या विरोधातील तलवार म्यान केली. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातही भाजपमधून बाहेर पडलेल्या जिल्हा परिषदेच्या सदस्या हर्षदा काकडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला केला. लोकसभा निवडणुकीत काकडे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर आल्या होत्या. पण, त्या राष्ट्रवादीत सक्रिय झाल्या नाहीत. परंतु त्यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर