शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

नगरकरांनी जाणून घेतले लष्करी सामर्थ्य

By admin | Updated: August 17, 2016 00:46 IST

अहमदनगर : सहा ते नऊ किलोमीटर फायर रेंज क्षमता असणारे अवाढव्य रणगाडे, वेगवेगळी क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक बंदुका आदी लष्करी शस्त्रास्त्रे प्रत्यक्षात पाहून नगरकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

अहमदनगर : सहा ते नऊ किलोमीटर फायर रेंज क्षमता असणारे अवाढव्य रणगाडे, वेगवेगळी क्षेपणास्त्रे, अत्याधुनिक बंदुका आदी लष्करी शस्त्रास्त्रे प्रत्यक्षात पाहून नगरकरांच्या डोळ्याचे पारणे फिटले. स्वातंत्र्यदिनी नगर-सोलापूर रस्त्यावरील फराहबाग येथे रणगाडा संग्रहालयात एसीसी अ‍ॅण्ड एस व एमआयआरसी या लष्करी प्रशिक्षण केंद्राच्या वतीने ‘जाणून घ्या आपल्या सैन्याला’ हा कार्यक्रम पार पडला. यावेळी सैन्य शस्त्रास्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. रणगाडा संग्रहालयातील वैशिष्ट्यपूर्ण व जगभरातील युद्धात सहभागी रणगाड्यांची माहिती सैनिकांनी नगरकरांना दिली.सुटीचा दिवस असल्याने हजारो नागरिक या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आले होते. सध्या लष्करी ताफ्यातील बलशाली रणगाडे, अत्याधुनिक बंदुका, क्षेपणास्त्रे, लाँचर, तसेच लष्करी विभागाबाबत सामान्य लोकांना असलेल्या शंकांचे निरसन सैनिकांनी केले. चित्रपट किंवा छायाचित्रात पाहिलेली ही शस्त्रास्त्रे प्रत्यक्षात पाहिल्याने अनेकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. लहान मुलांनी प्रत्यक्ष रणगाड्यात बसण्याची हौस पूर्ण करून घेतली. अनेकांनी देशाची शान असलेल्या सैनिकांबरोबर छायाचित्रे काढली. जवळच असलेल्या फराहबक्ष जलमहालालाही अनेकांनी भेट दिली. (प्रतिनिधी)