शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नगरच्या कुस्तीपटू भाग्यश्री फंड, धनश्री फंड ‘बेटी बचाओ’ अभियानाच्या प्रचारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 17:26 IST

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील भाग्यश्री फंड व धनश्री फंड या भगिनींनी कमी वयात राष्ट्रीय पातळीवर महिला कुस्तीत दैदीप्यमान कामगिरी केली आहे. 

श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी लोणार येथील भाग्यश्री फंड व धनश्री फंड या भगिनींनी कमी वयात राष्ट्रीय पातळीवर महिला कुस्तीत दैदीप्यमान कामगिरी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने फंड भगिनींची ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या अभियानाच्या प्रचारक म्हणून निवड केली आहे.राज्य शासनाच्या ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, अभियानाच्या प्रचारक म्हणून फंड भगिनींची निवड केल्याची घोषणा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे.भाग्यश्री व धनश्री फंड याा टाकळी लोणार येथील तसेच नाशिक येथे पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या हनुमंत फंड यांच्या कन्या आहेत. भाग्यश्रीने खेलो इंडिया राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले असून राष्ट्रीय व राज्य पातळीवरील स्पर्धेत अनेक सुवर्णपदके पटकावली आहेत़ भाग्यश्री ही इयत्ता सातवीत आळंदी येथे शिक्षण घेत आहे. धनश्रीने राज्य तसेच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळविले आहे. धनश्री इयत्ता सहावीत शिक्षण घेत आहे.ग्रामीण भागातील फंड भगिनींची अमीर खान यांच्या दंगल चित्रपटाप्रमाणे स्टोरी आहे. या मुलींचे वडिल हनुमंत हे मल्ल आहे. मात्र, नोकरीमुळे त्यांनी कुस्ती सोडली. मात्र, आपले कुस्तीचे स्वप्न मुलींच्या डोळ्यात पेरुन ते त्यांना कुस्तीचे अद्ययावत प्रशिक्षण देत आहेत. पुण्यातील कुस्ती प्रशिक्षक दिनेश गुंड यांच्या कुस्ती प्रशिक्षण केंद्रात दोघी सराव करीत होत्या. आता भाग्यश्रीची लखनौ येथे सुरू झालेल्या इंडिया कुस्ती प्रशिक्षण केंद्रात निवड झाली आहे. आॅलंपिक कुस्तीगिर साक्षी मलिक हिच्याबरोबर भाग्यश्री सध्या कुस्तीचा सराव करीत आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर