शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नगर मनपा निवडणूक २०१८ : युतीची आशा आता मावळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 11:53 IST

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने ३२ उमेदवारांची यादी जाहीर करुन स्वबळाचा नारा दिला आहे.

अहमदनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने ३२ उमेदवारांची यादी जाहीर करुन स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेने गुरुवारी १९ तर शनिवारी १३ जणांच्या नावावर शिक्कामोर्तब केले़ तर भाजपने स्वतंत्रपणे उतरण्याची तयारी केली आहे़ त्यामुळे महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीच्या आशा संपुष्टात आल्या आहेत़शिवसेना उपनेते अनिल राठोड, नगर दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली़ यात बहुतांश जुनेच चेहरे आहेत़ प्रभाग १ मधून दीपाली नितीन बारस्कर, डॉ. चंद्रकांत बारस्कर, प्रभाग २ मधून प्रियंका रघुनाथ तवले, प्रभाग ४ मधून योगिराज शशिकांत गाडे, प्रभाग क्रमांक ५ मधून कलावती शेळके, प्रभाग ६ मधून रवींद्र विलास वाकळे, प्रभाग ७ मधून अशोक बडे, कमल सप्रे, रिता शैलेश भाकरे, अक्षय कातोरे, प्रभाग ८ मधून रोहिणी शेडगे, पुष्पा अनिल बोरुडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, प्रभाग १२ मधून सुरेखा कदम, मंगल लोखंडे, प्रभाग क्रमांक १३ मधून उमेश कवडे, सुभाष लोंढे, संगीता बोज्जा, सुवर्णा गेन्नापा, प्रभाग १४ मधून भगवान फुलसौंदर, सुरेखा भोसले, रेखा भंडारी, प्रभाग १५ मधून सुवर्णा जाधव, विद्याताई खैरे, परसराम गायकवाड, प्रभाग १६ व १७ मधून दिलीप सातपुते व प्रभाग १७ मधून मोहिनी लोंढे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.सहा आयातांना संधीराष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या चंद्रशेखर बोराटे, कलावती शेळके, काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले सुभाष लोंढे, मोहिनी संजय लोंढे, भाजपमधून शिवेसेनेत आलेले दत्तात्रय कावरे तर मनसेतून शिवसेनेत आलेल्या सुवर्णा जाधव यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे.बहीण सेनेत तर भाऊ भाजपातप्रियंका कराळे या भाजप नगरसेवक महेश तवले यांची बहीण तर अनिकेत कराळे यांची पत्नी आहे. प्रियंका यांना शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे तर महेश तवले यांची भाजपकडून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे प्रियंका व महेश हे दोेघे एकाच प्रभागात मात्र वेगवेगळ्या पक्षातून निवडणुकीच्या आखाड्यात असतील़शिवसेना सर्व जागा लढवणार : राठोडनिवडणुकीला कमी दिवस राहिले आहेत. त्यामुळे तिसरी यादीही लवकरच जाहीर करणार आहोत. सर्व जागी शिवसेना उमेदवार देणार आहे. युतीसाठी वरच्या पातळीवर चर्चा सुरू आहे. पक्षप्रमुख जे आदेश देतील तसे आम्ही काम करणार आहोत. युती झाली तर जाहीर यादीत अजिबात बदल होणार नाही, असे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.मतदार यादीमध्ये घोळ - काळेदुसऱ्या प्रभागात साडेपाचशे नावे घुसवल्याची माजी उपमहापौर गीतांजली काळे यांनी जिल्हाधिकाºयाकडे तक्रार केली आहे. प्रभाग क्रमांक १५ मधील प्रथम जाहीर केलेल्या यादीत ही नावे नव्हती़ मात्र अंतिम यादीत अचानक ही नावे आली. बीएलओंनी ही नावे घुसवल्याची तक्रार काळे यांनी केली आहे. वेळ पडली तर न्यायालयात जाण्याची भूमिका काळे यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

सोमवारी भाजप-राष्ट्रवादीतील इच्छुकांच्या मुलाखतीमहापालिका निवडणुकीच्या आखाड्यात स्वतंत्रपणे उतरण्यासाठी भाजपनेही तयारी केली असून, सोमवारी (दि़ १२) भाजप पहिल्या सत्रात १ ते ५ प्रभागातील, दुसºया सत्रात ६ ते १० प्रभागातील आणि तिसºया सत्रात ११ ते १७ क्रमांकाच्या प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे़ सुमारे १६८ इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले आहेत, अशी माहिती भाजपा शहर जिल्हाध्यक्ष, खासदार दिलीप गांधी यांनी दिली.

आघाडीबाबत अद्याप बोलणी सुरुच काँगे्रस-राष्ट्रवादीच्या आघाडीबाबत अद्याप बोलणी सुरुच आहे़ राष्ट्रवादीकडून १०७ इच्छुकांनी अर्ज घेतले आहेत़ सर्व इच्छुकांच्या राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून मुलाखती होणार आहेत़ सर्व जागांसाठी मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती शहर जिल्हाध्यक्ष प्रा़ माणिक विधाते यांनी दिली़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर