शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
4
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
5
'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
6
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
8
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
9
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
10
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
11
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
12
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
13
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
14
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
15
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
16
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
17
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
18
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
19
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
20
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी

नवपदवीधरांनी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा द्याव्यात : एम.व्यंकय्या नायडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 17:25 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधांची गरज आहे. आरोग्य क्षेत्रातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी ही गरज पूर्ण करावी.

शिर्डी : ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधांची गरज आहे. आरोग्य क्षेत्रातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी ही गरज पूर्ण करावी. आज देशात आरोग्य क्षेत्रात नवनवीन संकल्पनांमुळे आणि चांगल्या उपचार पद्धतीमुळे भारत आरोग्य पर्यटन हब बनला आहे. बाहेरील देशांचे रुग्ण येथे उपचारासाठी येतात. ही आपल्या आरोग्य क्षेत्रातील विकासाची पावती आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती एम.व्यंकय्या नायडू यांनी केले.प्रवरा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस अभिमत विद्यापीठाचा तेरावा पदवीप्रदान कार्यक्रम सोमवारी उपराष्ट्रपती नायडू यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्यावेळी पदवीप्राप्त स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करताना नायडू बोलत होते. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, कुलपती डॉ. विजय केळकर, प्रभारी कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ.वाय.एम. जयराज, प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ.अशोक पनगारिया आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.यावेळी उपराष्ट्रपती नायडू यांच्या हस्ते विद्यापीठात विविध विद्याशाखांत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन गौरवण्यात आले. डॉ.पनगारिया यांना डॉक्टर आॅफ सायन्स पदवीने सन्मानित करण्यात आले. नायडू पुढे म्हणाले, लोणीसारख्या ग्रामीण भागात आरोग्य क्षेत्रात इतक्या चांगल्या प्रकारे काम सुरु आहे, याचे खरोखर समाधान आहे. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवली. पद्मभूषण बाळासाहेब विखे यांनी या कामाचा अधिक विस्तार केला. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील विविध क्षेत्रातील दरी मिटवण्यासाठी पुढे आले पाहिजे. महात्मा गांधींनी ‘खेड्यांकडे चला’ असा नारा दिला. मात्र, आज परिस्थिती वेगळी दिसत आहे. ग्रामीण भागातून ओढा शहरांकडे स्थलांतरित होताना दिसतो आहे. हे चित्र आपल्याला बदलायला हवे, त्यासाठी तरुण पिढीची मोठी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.सेवाभाव हा स्थायीभाव झाला पाहिजे. आपल्या करिअरच्या सुरुवातीला आपण तो अंगी बाळगला तर यापेक्षा देशप्रेमाची भावना दुसरी काय असू शकेल, अशी भावना व्यक्त करुन नायडू यांनी आरोग्य आणि ग्रामविकास क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज व्यक्त केली. या पदवीप्रदान सोहळ्यात सुवर्णपदक जिंकलेल्यांत मुलींची संख्या जास्त असल्याचा आवर्जून उल्लेख करीत त्यांनी आपल्या देशाने पुराणकाळापासून स्त्रियांना महत्वाचे स्थान दिल्याचे सांगितले. ही परंपरा या विद्यार्थिनी पुढे नेत असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर