शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कंटेनरखाली चिरडून माय-लेकाचा मृत्यू

By admin | Updated: July 13, 2016 00:36 IST

कोल्हार/राहुरी : कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली सापडून मायलेक ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी नगर-मनमाड महामार्गावर कोल्हारजवळील प्रवरा नदी पुलाच्या उतारावर घडली.

कोल्हार/राहुरी : कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली सापडून मायलेक ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी नगर-मनमाड महामार्गावर कोल्हारजवळील प्रवरा नदी पुलाच्या उतारावर घडली. मंगल भाऊसाहेब जपे (वय ६६) व त्यांचा मुलगा विजय भाऊसाहेब जपे (वय ३५, रा. निमगाव घाणा, ता. नगर) अशी मृतांची नावे आहेत. जपे मायलेक मंगळवारी दुपारी एका कार्यक्रमाहून परतत असताना त्यांच्या मोटारसायकलला हा अपघात झाला. कोल्हार (ता. राहाता) जवळील प्रवरा नदी पूल ओलांडून जपे मायलेक पुढे नगरच्या दिशेने निघाले असता पाठीमागून येत असलेल्या कंटेनरने (एम.एल. ०१, एस. ९११७) त्यांच्या मोटारसायकलला (एम.एच. १६, ७५६७) धडक दिली. त्यामुळे हे दोघेही मोटारसायकलसह कंटेनरच्या चाकाखाली चिरडले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पुलाच्या उतारावर हा अपघात झाल्याने कंटेनरने बरेच लांब मोटारसायकलला फरफटत नेले. राहुरी पोलिसांनी घटनास्थळी येत दोन्ही मृतदेह बाहेर काढले. त्यासाठी पोलीस हेडकॉन्स्टेबल बाळू घोडे यांना स्थानिक ग्रामस्थ संजय शिरसाठ, अण्णा शिरसाठ, राजेंद्र भोसले यांनी मदत केली. अपघातामुळे पोलिसांनी नगरकडे होणारी वाहतूक जुन्या समांतर पुलावरून वळवली होती. राहुरी पोलिसांनी कंटेनरचालकास ताब्यात घेतले आहे. (वार्ताहर)