अहमदनगर : महापालिका क्षेत्रात नागरिकांच्या सहभागातून निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वांवर आधारित उपाययोजना करून शाश्वत निसर्गपूरक जीवनपद्धती अवलंबिण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रेसिडेन्सिअल महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी प्रतिज्ञा घेतली.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित असणाऱ्या या अभियानांतर्गत मानवी स्वभावामध्ये पर्यावरणपूरक बदल घडविण्यासाठी जनजागृती व शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे प्रसार व प्रचार करण्यात येत आहे. याच अनुषंगाने बुधवारी नगर येथील रेसिडेन्सिअल कनिष्ठ महाविद्यालयामध्ये ‘कोविड-१९’च्या नियमांचे काटेकोर पालन करून पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांनी दिलेल्या ‘माझी वसुंधरा’ या प्रतिज्ञेचे सार्वजनिक वाचन करण्यात आले.
प्राचार्य ए. आर. दोडके यांनी प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य प्रा. कैलास गोरे, समन्वयक प्रा. गव्हाणे, क्रीडा संचालक प्रा. संदेश भागवत, प्रा. आकोलकर, प्रा. गदादे, प्रा. परदेशी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
---
२४रेसिडेन्सिअल