शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुशायरात रंगले नगरकर

By admin | Updated: September 1, 2014 00:03 IST

अहमदनगर : देशातील नामवंत शायरांनी सादर केलेल्या शेरोशायरी, गजल रचनांना वाहवा,बहोत खूब, क्या बात है अशी दाद देत नगरकर रसिकांनी मुशायराचा आनंद लुटला.

अहमदनगर : देशातील नामवंत शायरांनी सादर केलेल्या शेरोशायरी, गजल रचनांना वाहवा,बहोत खूब, क्या बात है अशी दाद देत नगरकर रसिकांनी मुशायराचा आनंद लुटला. उत्तररात्रीपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात रसिक रंगून गेले.गणेशोत्सवानिमित्त नगर व्यासपीठ आयोजित सतराव्या नगर महोत्सवात मुस्लीम बँक यांच्यावतीने आयोजित अखिल भारतीय मुशायरा कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाला.मान्यवरांची उपस्थितीव्यासपीठावर पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते मुन्नवर पीरभाई, मनसेचे नेते वसंत लोढा, उद्योजक रामशेठ मेंघाणी, मुस्लीम बँकेचे उपाध्यक्ष सलिम मणियार, सीईओ.जे.एल.मद्रुपकर, व्यवस्थापक जावेद, सौदागर तौफीक हुसेन, संयोजक आर्किटेक्ट इकबाल सय्यद, डॉ.कमर सुरुर, नगर व्यासपीठचे संयोजक सुधीर मेहता,उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण, सुशील शाह आदी उपस्थित होते.सभागृहात हास्यकल्लोळशायर आजाद अन्वर यांच्या नाद पठणाने मुशायराचा प्रारंभ झाला.प्रसिद्ध हास्य कवी मुजावर मालेगावी यांच्या हास्य, विडंबन रचनांनी सभागृहात हास्यकल्लोळ झाला. त्यांनी देशभक्तीपर रचनाही ऐकविल्या.उपस्थित अंतर्मुखअमरावतीचे शायर इकबाल साहिल यांच्या ‘हादसे ऐसे भी होते है यहाँपर साहिल .... आदमी घर नही आता खबर आती है’ या रचनेने मानवी जीवनातील असुरक्षितता कथन केली. ‘दिल को फिर दर्द से आबाद किया है मैने .... मुद्दतो बाद तुझे याद किया मैने’या रचनेने महेताब आलम यांनी प्रेम भावनेची अनुभूती रसिकांपुढे मांडली तर आई बद्दलच्या भावना मांडताना मुस्लीम खरगोन्वी यांनी ‘माँ की नसीहतोसे मुहब्बत ना कर सके....हम नेकीयो वाली भी तिजारत ना कर सके’असे सांगत उपस्थितांना अंतर्मुख केले.कवयित्री मुमताज पीरभाई यांनी सादर केलेल्या सुरेल रचनांना उपस्थितांनी दाद दिली.कवि मंजूर नदीम,बिलाल अहमदनगरी, गनी मोहंमद गनी, मोहंमद शाकीर सर,तौफिक हुसेन, कवयित्री डॉ.कमर सुरुर यांनी सादर केलेल्या गजल रचनांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.स्वातंत्र्य संग्रामावर भाष्यकार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ शायर डॉ. नईम अख्तर यांनी ‘उल्फते इकबाल, इश्के मीर कैसे बेच दूँ ...ऐ वतन दिल की ये जागीर कैसे बेच दूँ ,इसमें आजादी के नारों की खनक मौजूद है...कैदीयों के पाँव की जंजीर कैसे बेच दूँं’ या रचनेतून स्वातंत्र्य संग्रामावर भाष्य केले.मान्यवरांचा सत्कारमहोत्सवाचे संयोजक सुधीर मेहता यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सलीम मणियार यांनी मुस्लीम बँकेच्या उपक्रमाची माहिती देऊन मुशायरा संयोजकांचे कौतुक केले. इंजि. इकबाल सय्यद, आबीद खान, राजूभाई आदींनी संयोजन केले. (प्रतिनिधी)