आॅनलाइन लोकमत
श्रीगोंदा (अहमदनगर), दि. ३१ - जमिनीच्या वादातून श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दोन गटात झालेल्या वादातून माजी नगराध्यक्ष नंदकुमार बोरुडे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर श्रीगोंद्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.
जखमी बोरुडे यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर दोन्ही गटाचे कार्यकर्ते ग्रामीण रुग्णालयात आले. रुग्णालयातच होले व बोरुडे गटात तुफान हाणामारी झाली. पोलिसांना संपर्क करूनही पोलीस घटनास्थळी उशिरा आले. त्यांनी मारामारी सोडविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पोलीसांनाही प्रसाद मिळाला. पोलिसांनी बळाचा वापर करून गोंधळ घालणारांना ताब्यात घेतले आहे.
होले व बोरूडे गटात यापूर्वी पाण्याच्या वादातून हाणामारी झालेली आहे. या घटनेमुळे श्रीगोंदा शहरात तणाव निर्माण झाला आहे.