शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून : शेवगाव शहरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 17:08 IST

अनैतिक संबंधातून शहरातील तरुणाचा बुधवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली.

शेवगाव : अनैतिक संबंधातून शहरातील तरुणाचा बुधवारी रात्री निर्घृण खून करण्यात आला. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करून या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली.बापूसाहेब एकनाथ घनवट (वय-३७ रा. म्हसोबानगर शेवगाव, मूळ गाव नजीक बाभूळगाव, ता.शेवगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. शहरातील पाथर्डी रस्त्यावरील आयटीआयसमोरील मोकळ्या जागेत गुरुवारी सकाळी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. त्याच्या डोक्यावर व तोंडावर जबर दुखापत करून त्याचा खून केला असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली व मृतदेहाची ओळख पटवून तपासासाठी तीन पथके तैनात केली. घटनास्थळाच्या बाजूला राहत असलेल्या महिलेशी मयताचे अनैतिक संबंध होते. त्यातून हा प्रकार घडला असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी त्या महिलेस ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली. बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास कृष्णासिंग पूनमसिंग भोंड (वय २२), परमेश्वर पूनमसिंग भोंड (वय १९), लक्ष्मण किसन कांबळे (वय ३०) तिघे रा. रामनगर, शेवगाव यांनी बापूसाहेब घनवट यास मारहाण केल्याची माहिती दिली. या माहितीवरून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.मयतास लोखंडी रॉडने मारहाण करून त्याच्या अंगावर गवत टाकून मृतदेह लपवून ठेवल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. त्या तिघांविरुद्ध खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.उप विभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक भरत काळे, सोपान गोरे, पोलीस नाईक राजू चव्हाण, राजेंद्र केदार, महादेव घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण बागुल, वासुदेव डमाळे, राजेंद्र नागरगोजे, संदीप दरवडे, सोमनाथ सोनटक्के, किशोर शिरसाठ, अभय लबडे, बाळासाहेब नागरगोजे, अमोल ढाळे यांच्या पथकाने आरोपींना पकडले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर