शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कुऱ्हाडीचे घाव घालून विवाहीत पुतणीचा खून, दुसऱ्या तरूणासोबत बोलल्याचा आला राग

By सचिन धर्मापुरीकर | Updated: October 19, 2023 15:01 IST

बुधवारी रात्री साडेबारा वाजता ही घटना कोपरगाव शहरापासून जवळच असलेल्या खडकी भागात घडली.

सचिन धर्मापुरीकर

कोपरगाव (जि. अहमदनगर) : 'तु दुसऱ्या तरूणासोबत का बोलतेस' म्हणून रागावलेल्या काकाने विवाहित पूतणीवर कुऱ्हाडीने वार केले. यात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोपरगाव शहर पोलिसांनी काकाला अटक केली आहे. बुधवारी रात्री साडेबारा वाजता ही घटना कोपरगाव शहरापासून जवळच असलेल्या खडकी भागात घडली.

नेहा संदीप कांबळे (वय २१, ह.मु. सप्तशृंगी मंदीराजवळ खडकी) असे मयत महिलेचे नाव असून संतोष हरीभाऊ आरणे (वय २६, रा. खडकी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नेहा संदीप कांबळे ही अनेक दिवसांपासून माहेरी म्हणजे आई ज्योती नंदकिशोर आरणे यांच्याकडे खडकी भागातील सप्तशृंगी माता मंदिराजवळ राहात होती. बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास ती घराबाहेर लघुशंकेसाठी आली होती. यावेळी नेहाचा काका संतोष आरणे हा तीथे आला. 'तु दुसऱ्या तरूणासोबत का बोलतेस' म्हणून तीच्याशी भांडू लागला. दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर संतोषने नेहाच्या दोन्ही पायांवर सोबत आनलेल्या कुऱ्हाडीने वार केले. जखमी असस्थेत नेहाला तीथेच सोडून संतोष आरणे पळून गेला. जखमी नेहाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान अतिरक्तस्त्रावामुळे तीचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नरीक्षक प्रदीप देशमुख हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोंचले. पंचनामा केल्यानंतर लगेचच शोध घेऊन संतोष आरणे यास अटक केली आहे. याघटनेबाबत मयत नेहाची आई ज्योती नंदकिशोर आरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संतोष आरणे याच्या विरूद्ध भादंवि ३०२ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.काका-पूतणी होते अनैतिक संबंध

मयत नेहा संदीप कांबळे व तिचा काका संतोष आरणे यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. नेहा माहेरी आल्यानंतर ती दुसऱ्याशी बोलल्याचा राग संतोषला आला व त्याने तीचा खून केला. आरोपी पोलिस कोठडीत असून त्याने गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी दिली आहे.फोटो- १९ नेहा कांबळे