शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नगर मनपा निवडणूक : पैसे घेणा-या मतदारांवरही फौजदारी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 11:45 IST

उमेदवारांची पात्रता न बघता अनेक मतदारही दारु, पैसा व भेटवस्तूंच्या आमिषाला बळी पडून मतदान करतात. अशा मतदारांचाही आता जिल्हा प्रशासनाने शोध सुरु केला आहे.

अहमदनगर : उमेदवारांची पात्रता न बघता अनेक मतदारही दारु, पैसा व भेटवस्तूंच्या आमिषाला बळी पडून मतदान करतात. अशा मतदारांचाही आता जिल्हा प्रशासनाने शोध सुरु केला आहे. मतदार पैसे घेताना आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे निवडणूक शाखेने सांगितले.नगरच्या निवडणुकीत पैसा, दारु या बाबींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. काही उमेदवारांनी एक कोटी रुपयांपर्यंत निवडणुकीचे बजेट ठेवले आहे. मताला पैसे ठरवून घरनिहाय पैसे देण्याचा उद्योग काही उमेदवारांनी सुरु केला आहे. मतदारांना पैसे वाटायचे व नंतर विकास कामे न करता टक्केवारी काढायची असा गोरखधंदाच सुरु आहे. नगरचा विकास रेंगाळण्यास नगरच्या मतदारांची ही मानसिकताही कारणीभूत ठरली आहे.अपार्टमेंटमध्ये राहणारे काही उच्चभ्रू मतदार देखील भेटवस्तू व पैशांची अपेक्षा बाळगून आहेत. त्यामुळेच मतदारांवरही करडी नजर ठेवण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. शहरात अनेक प्रभागात सीसीटीव्ही आहेत. अपार्टमेंटमध्येही सीसीटीव्ही आहेत.मतदानाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात कोण कोण आले? त्यांचा उद्देश काय होता? हे तपासले जाणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी बँकांमधील व्यवहार तपासण्याचाही निर्णय घेतला आहे.उमेदवार पसंत नसेल तर ‘नोटा’ दाबा : ग्राहक संघनगरच्या मतदारांनी दारु, पैसा याच्या मोहाला बळी पडून मतदान करु नये. नागरिकांच्या या वृत्तीनेही शहराचे नुकसान केले आहे. आपणाला कोणताही उमेदवार पसंत नसेल तर मतदानालाच जायचे नाही हाही पर्याय योग्य नाही. उमेदवार पसंत नसेल तर ‘नोटा’चे बटन दाबण्याचा पर्याय मतदारांकडे आहे, असे आवाहन ग्राहक संघाचे शिरीष बापट यांनी केले आहे.हॉटेलांचीही होणार तपासणीशहरात अनेक हॉटेलांमध्ये मोफत जेवणावळी सुरु आहेत. मतदारांना पार्टी द्यायची व त्याची बिले घ्यायची नाहीत, असे आमिष दाखवले जात आहे. हॉटेलमध्ये किती लोक जेवणासाठी आले व तेवढी बिले संगणकावर आहेत का? अशी शहानिशा करण्याचेही प्रशासनाच्या विचाराधीन आहे. यासाठी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.प्रशासनाला गोपनीय माहिती कळवाअनेक प्रभागात दारु, पैशांचे वाटप सुरु झाले आहे. मात्र, प्रभागातील सुजाण नागरिक याबाबत मौन बाळगून असतात. नागरिकांनी याबाबत माहिती दिल्यास ती गोपनीय ठेवली जाईल, असे प्रशासनाने कळविले आहे. नागरिकांना पैसे, दारु वाटपाबाबत काही माहिती समजल्यास पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके (८१४९५३२५७७), आचारसंहिता कक्ष प्रमुख संदीप निचीत (९६६५६६९७७७), उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ (९४२३४६८१११) यांच्याकडे माहिती कळवू शकतात. तक्रार करणाºयांची नावे गोपनीय ठेवली जाणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी सांगितले.उमेदवारांनी केले मतदारांचे आधार कार्ड जमाअनेक प्रभागात उमेदवारांनी बेकायदेशीरपणे मतदारांचे आधार कार्ड जमा केले आहे. पैसे देऊन मतदारांचे आधारकार्ड ताब्यात घ्यायचे व मतदानाला जाताना हे आधार कार्ड ताब्यात द्यायचे. जेणेकरुन हा मतदार इतर कुणाला मतदान करणार नाही, अशी ही शक्कल आहे. अनेक प्रभागांत पैशांचे वाटप सुरु झाली असल्याची चर्चा आहे. मात्र, अधिकृतपणे कुणीही याबाबत बोलत नाही.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर