शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी पदभार स्वीकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदाचा शंकर गोरे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. गोरे यांच्या रूपाने महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाले ...

अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदाचा शंकर गोरे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. गोरे यांच्या रूपाने महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कारभाराला गती मिळण्यास मदत होणार आहे.

महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त श्रीकांत मायकलवार हे ३१ डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार होता. अधिकारी भोसले यांनी दीड महिना महापालिकेचा कारभार पाहिला. महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त नसल्याने अनेक कामे थांबली होती. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंकर गोरे यांची १२ फेब्रुवारी रोजी पदोन्नतीने अहमदनगर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे नगर दौऱ्यावर असताना त्यांनी गोरे हे महापालिकेला नवीन आयुक्त मिळाले असल्याची माहिती दिली होती. परंतु गोरे घरगुती कारणामुळे महापालिकेत रुजू झाले नव्हते. त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. गोरे यांनी यापूर्वी सातारा, चाळीसगाव नगर परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. महापालिकेचा कारभार गोरे यांच्यासाठी नवीन आहे. यापूर्वी त्यांनी आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही. ते प्रथमच अहमदनगर महापालिकेत आयुक्त म्हणून रुजू झाले आहेत.

....

नगर शहराचा अभ्यास करून विकासकामांचे नियोजन केले जाईल. विभागप्रमुखांची एकत्रित बैठक सायंकाळी बोलाविण्यात आलेली आहे. सर्व विभागांची माहिती घेऊन जी कामे थांबलेली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाईल.

-शंकर गोरे, आयुक्त, महापालिका

....

अधिकाऱ्यांची ओळख परेड

महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर गोरे यांनी चार वाजता पाणीपुरवठा, बांधकाम, आरोग्य आदी सर्व विभागांतील विभागप्रमुखांची ओळख करून घेऊन कामकाजाची माहिती घेतली आणि काही सूचनाही केल्या.