शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर: कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन

By अरुण वाघमोडे | Updated: April 26, 2023 16:53 IST

अकरा गंभीर मुद्दे उपस्थित करत सखोल चौकशीसाठी तत्काळ समिती नेमण्याची मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

अहमदनगर: वेतन दरवाढीच्या मागणीसाठी रेल्वे माल धक्क्यावरील कामगारांनी संतप्त होत अचानकपणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी मुंडन आंदोलन केले. 

यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी मंडळ अध्यक्ष नितीन कवले व  मंडळाचे सचिव तुषार बोरसे यांच्या रभाराबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी ठेकेदारांशी संगनमत केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. अकरा गंभीर मुद्दे उपस्थित करत सखोल चौकशीसाठी तत्काळ समिती नेमण्याची मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली.

आठ दिवसांच्या आत समिती न नेमल्यास बेमुदत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मागील दोन वर्षांपासून वेतन दरवाढीसाठी कामगार न्याय मागत आहेत. फेब्रुवारी महिन्यात यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर अंमलबजावणीचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार ठेकेदारांच्या विरुद्ध सुमारे साडेतीन कोटींच्या वसुलीची कारवाई सुरू करण्यात आली होती.

मात्र ठेकेदारांनी या वसुलीला विरोध करत बंद पुकारण्याचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी आयोजित बैठकीला आंदोलनाशी व वेतन दरवाढीशी संबंध नसणाऱ्या तथाकथित टोळी प्रमुखांना व एका संघटनेला निमंत्रित करण्यात आले होते. यावर कामगारांनी जोरदार आक्षेप घेतला. वेतन वाढ मागणाऱ्या आंदोलनकर्त्या कामगारांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले असे म्हणत संतप्त कामगारांनी सहाय्यक कामगार आयुक्त कवले, मंडळाचे सचिव बोरसे व ठेकेदार यांच्यामध्ये संगनमत सुरू असल्याचा आरोप केला आहे.