शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुळा एज्युकेशनची जागा वनविभाग ताब्यात घेणार : हरित लवादाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 16:57 IST

तालुक्यातील मुळा शैक्षणिक संस्था उभी असलेली वन विभागाची १२० एकर जागा वन विभागास परत करण्याचे आदेश राष्टÑीय हरित लवादाने दिले आहेत.

नेवासा : तालुक्यातील मुळा शैक्षणिक संस्था उभी असलेली वन विभागाची १२० एकर जागा वन विभागास परत करण्याचे आदेश राष्टÑीय हरित लवादाने दिले आहेत. त्यामुळे या जागेवरील संस्थेच्या शैक्षणिक संकुलाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाने जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केली आहे.याबाबत संस्थेच्या कार्यालयातून मंगळवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी कोणत्याही आदेशाची वाट न पाहता एका महिन्यात संस्थेकडून ही जमीन घेऊन वन विभागाकडे हस्तांतरित करण्याची कारवाई करण्याचे आदेश हरित लवादाने दिले आहेत. त्यामुळे या संस्थेच्या संकुलात विविध अभ्यासक्रमास शिकणारे सुमारे ७ हजार विद्यार्थी, कर्मचारी तसेच सोनई परिसरातील लहान मोठे व्यावसायिक यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नेवासा तालुक्यातील राजेंद्र आगळे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर लवादाने समिती गठीत करून चौकशी केली. त्यात २ फेब्रुवारी २०१९ ला अहमदनगरच्या उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांनी याबाबत अहवाल दिला. त्यानुसार मुळा शिक्षण संस्थेच्या ताब्यातील १२० एकर जमीन ही वन खात्याची आहे. तर संस्थेची २३ हेक्टर जमीन आहे. उर्वरित काही जमिनीवर शेतकरी आहेत. तेथे आजूबाजूला मोठी लोकवस्ती आहे, असे अहवालात स्पष्ट केले आहे.मुळा शैक्षणिक संस्थेने या जागेवरील झाडे तोडली असाही आरोप आहे. ही कारवाई होत असताना तेथे सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संस्थेच्या सोनईतील संकुलात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय यासह विविध महाविद्यालये आहेत. त्यातील सुमारे ७ हजार विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.दरम्यान याबाबत संस्थेचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र संपर्क होऊ शकला नाही. संस्थेतर्फे इतरही कोणी याबाबत बोलण्यास पुढे आले नाही़जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठपुरावा केला. राष्ट्रीय हरित लवादाने महिनाभरात संस्थेच्या ताब्यातील वन विभागाची १२० एकर जमीन वन विभागाकडे हस्तांतरित करून अहवाल पाठविण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू आहे. - राहुल द्विवेदी, जिल्हाधिकारी, अहमदनगर.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर