शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त, प्रशासक नियुक्त; सहकार विभागाची औरंगाबाद खंडपीठात माहिती

By शिवाजी पवार | Updated: May 2, 2023 19:21 IST

खंडपीठात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप व अमृत धुमाळ यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती.

श्रीरामपूर : येथील मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्रशासक नियुक्त करण्यात आल्याची माहिती सहकार विभागाने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दिली.खंडपीठात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, युवराज जगताप व अमृत धुमाळ यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सहकार विभागाच्या वतीने खंडपीठात मंगळवारी म्हणणे सादर करण्यात आले. त्यात संस्थेवर राहाता येथील सहायक निबंधक रावसाहेब खेडकर यांची प्राधिकृत अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांनी दिली. याचिकेचे काम विधीज्ञ अजित काळे हे पाहत आहेत. त्यांना विधीज्ञ साक्षी काळे व  प्रतीक तलवार हे सहाय्य करत आहेत.संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत ३ जानेवारी २०२१ मध्ये संपली होती. त्यामुळे सहकार विभागाने निवडणूक प्रक्रिया राबवत अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली होती. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने प्रति सभासद १४८ रुपये या प्रमाणे संस्थेच्या एक लाख ५५ हजार ५८८ सभासदांचे दोन कोटी ३३ लाख ७१ हजार रुपयांची मागणी संस्थेकडे केली होती. ही रक्कम जिल्हा सहकारी बँकेच्या नगर येथील खात्यावर भरून चलनाची प्रत कार्यालयाला सादर करण्याचे आदेश प्राधिकरणाने बजावले होते. मात्र संस्थेने हे पैसे भरण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे हे पैसे सहकार प्राधिकरणाला वेळेत मिळू शकले नाहीत. त्यामुळे संस्थेचे संचालक मंडळ बेकायदारित्या तेथे कार्यरत असल्याचे सहकार विभागाने म्हटले आहे.सहकारी संस्था अधिनियम १९६०च्या कलम ७७ अ नुसार बरखास्त संचालक मंडळ बरखास्त करून तेथे प्राधिकृत अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले. अधिकार्यांचा कालावधी हा एक वर्षाकरिता राहणार आहे. या दरम्यान संस्थेच्या निवडणुकीकरिता खर्च वसूल केला जाणार आहे. मुळा प्रवरा वीज संस्थेच्या अध्यक्षपदी खासदार डॉ.सुजय विखे होते. त्यांच्या नेतृत्वाखाली राहाता, श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील प्रमुख पक्षाचे संचालक मंडळ कार्यरत होते. मागील निवडणुकीवेळी सर्व नेते एकत्र आल्याचे पहायला मिळाले होते. 

टॅग्स :Courtन्यायालयAhmednagarअहमदनगर