अहमदनगर : शहरासह उपनगरांतील विविध वसाहतींमध्ये कृत्रिम कुंड तयार करून त्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
सावेडी उपनगरासह नागापूर, बोल्हेगाव, सारसनगर, केडगाव आदी भागांतील अपार्टमेटमध्ये कृत्रिम जलकुंड तयार करण्यात आले होते. वाजतगाजत चिमुकल्यांनी आपल्या गणरायाला निरोप दिला. सावेडी उपनगरातील पाइपलाइन रोड, तपोवन रोड, कुष्ठधाम रोड परिसरातील बहुतांश सोसायटींमध्ये नागरिकांनी स्वखर्चाने कृत्रिम जलकुंड तयार केले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरच्या घरी विसर्जन करून खबरदारी घेतली. कुंडात गुलाबाच्या पाकळ्या, फुले सोडण्यात आली होती. त्याचे फोटो, व्हिडिओही अनेकांनी सोशल मीडियावरून शेअर केले. अंगणात अनेकांनी बादली, टीपमध्ये बाप्पांचे विसर्जन केले. त्यासाठी अंगणात रांगोळी, फुलांचा सडाही टाकला. काहींनी तर सनईच्या सुरात निरोप दिला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळून नागरिकांनी सुरक्षितपणे विसर्जन केले. यावेळी मोदकाचा प्रसादही वाटप झाला.
...
सूचना फोटो २० अमित गटणे नावाने आहे.