शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खासदार लोखंडे यांना बंगल्यात घुसून शिवीगाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:19 IST

आरोपींमध्ये उदय लिप्टेसह चार अन्य अज्ञांत तरुणांचा समावेश आहे. या सर्व जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात ...

आरोपींमध्ये उदय लिप्टेसह चार अन्य अज्ञांत तरुणांचा समावेश आहे. या सर्व जणांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंगरक्षक पोलीस हवालदार विनोद उंडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अंगरक्षक पोलीस हवालदार विनोद उंडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

खासदार सदाशिव लोखंडे यांचे उंबरगाव येथील साई खेमानंद फाउंडेशन येथे वास्तव्य असते. तेथे त्यांचा बंगला आहे. बुधवारी रात्री ८ वाजेच्या दरम्यान उदय शिवाजी लिप्टे व इतर चार तरुण दोन दुचाकीवर तेथे आले. बंगल्याचे प्रवेशद्वार उघडून त्यांनी कर्मचारी नीलेश शिंदे यांना जाब विचारला व शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. आत प्रवेश करून तेथील दोन वाहनांचे व्हिडिओ शुटिंग सुरू केले. वाहनांवरील कापड फाडून खासदार लोखंडे याच्या निवासस्थानाकडे प्रवेश केला. यावेळी तरुणांना रोखण्यासाठी सरसावलेल्या अंगरक्षकाला लिप्टे व त्यांच्या साथीदारांनी धक्काबुक्की केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हे तपास करत आहेत. सर्व फरार आरोपींचा शोध सुरू असल्याचे घायवट यांनी लोकमतला सांगितले.

---

काय आहे नेमके प्रकरण

खासदार लोखंडे यांनी लोकसभा निवडणुकीत एलईडी स्क्रीनच्या प्रचारार्थ दोन वाहने वापरली होती. ही वाहने त्यांच्या बंगल्यात उभी आहेत. आरोपी उदय शिवाजी लिप्टे याने कोरोना रुग्णांसाठी रुग्णवाहिका म्हणून या वाहनांचा वापर करावा, अशी मागणी करत बुधवारी राडा केला असे तपासी अधिकारी घायवट म्हणाले.

----

खासदारांकडे रुग्णवाहिका मागणे गैर नाही. मात्र चुकीची पद्धत वापरल्याने गुन्हा दाखल करावा लागला. आरोपींनी हा प्रकार कुणाच्या सांगण्यावरून केला याची चौकशी झाली पाहिजे. आरोपींनी निव्वळ प्रसिद्धीसाठी हा स्टंट केला आहे. जिल्हा पोलीस प्रमुखांनी अशा प्रवृत्तीवर कडक कारवाई करावी.

- राजेंद्र देवकर, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना