शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जात पडताळणीची रिक्त पदे भरण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 11:40 IST

राज्यातील सर्व ३६ जात पडताळणी समित्यांची पदे मंजूर असतानाही शासनाकडून भरली जात नसल्याने निम्म्या महाराष्ट्रात समितीला अध्यक्षच नाहीत.

अहमदनगर : राज्यातील सर्व ३६ जात पडताळणी समित्यांची पदे मंजूर असतानाही शासनाकडून भरली जात नसल्याने निम्म्या महाराष्ट्रात समितीला अध्यक्षच नाहीत. त्याचा फटका राज्यातील लोकप्रतिनिधी, नोकरदार, तसेच विद्यार्थ्यांना बसत असल्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आता ही पदे भरण्याबाबत शासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी राज्यातील २७ अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची माहिती महसूल विभागाने मागवली आहे.राज्य शासनाने २०१६ पासून प्रत्येक जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यात ३६ जात पडताळणी समित्या स्थापन झाल्या. त्यामध्ये अध्यक्षपदी अतिरिक्त जिल्हाधिकारी किंवा सामाजिक न्याय विभागातील समकक्ष अधिकारी, सदस्यपदी समाजकल्याण उपायुक्त दर्जाचा अधिकारी आणि सदस्य सचिव म्हणून सहायक आयुक्त किंवा समाजकल्याण विभागाचा तत्सम अधिकारी ही पदे मंजूर करण्यात आली. परंतु यातील समितीचे अध्यक्ष म्हणजे अतिरिक्त जिल्हाधिकाºयांच्याच १८ जागा रिक्त आहेत. नियुक्त असलेल्या १८ जणांना इतर जिल्ह्यांचा अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागतो. शिवाय बºयाच जिल्ह्यांत सदस्य व सदस्य सचिवही भरले गेलेले नाहीत. जात पडताळणी समितीला सहाय्य करण्यासाठी पोलीस उपाधीक्षक, निरीक्षक व कॉन्स्टेबल ही पदेही मंजूर आहेत. परंतु त्याचीही हीच त-हा आहे. मनुष्यबळ कमी असल्याने जात प्रमाणपत्र वेळेत वितरीत होत नाहीत. त्याचाच फटका सध्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्यातील हजारो स्थानिक संस्थांच्या सदस्यांना बसून त्यांना अपात्र व्हावे लागले.याबाबत ‘लोकमत’ने पंधरा दिवसांपूर्वी ‘निम्म्या महाराष्ट्रात ‘जात पडताळणी’चे अध्यक्षच नाहीत’ असे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत राज्याच्या महसूल विभागाने सर्व विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील २७ अधिकाºयांची खातेनिहाय माहिती मागवली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय