शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डीत धनगर आरक्षणासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 13:25 IST

तालुक्यातील सकल धनगर समाजाच्यावतीने एस.टी आरक्षण अंमलबजावणीसाठी आज दुपारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा आणण्यात आला होता.

पाथर्डी : तालुक्यातील सकल धनगर समाजाच्यावतीने एस.टी आरक्षण अंमलबजावणीसाठी आज दुपारी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा आणण्यात आला होता. धनगर समाजाच्या वतीने शहरातील खोलेश्वर महादेव मंदिरात पूजा करण्यात आली त्यानंतर शेळ्या मेंढ्या सह मोर्चा वसंतराव नाईक चौक ते तहसील कार्यालय अश्या मार्गे मागण्या संदर्भात घोषणा बाजीकरत मोर्चा आणण्यात आला होता.आरक्षण संदर्भात मागन्याचे निवेदन तहसीलदार नामदेव पाटील यांना देण्यात आले.धनगर समाजाच्यावतीने तहसिलदार नामदेव पाटील यांना १८ आॅगस्ट रोजी निवेदन दिले होते. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजास अनुसूचित जमातीचे दाखले देऊन देण्यात आलेल्या सवलतीची अंमलबजावणी करावी. सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे. धनगर आरक्षण आंदोलना दरम्यान दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत. समांतर आरक्षणाचे शासनाने काढलेले परिपत्रकामध्ये सुधारणा करण्यात याव्यात. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवगार्तून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा परीक्षा देण्यासाठी पूर्वीच्या सवलती कायम ठेवण्यात याव्यात. सर्वोच्च न्यायालयाच्या व केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे आरक्षणाप्रमाणे पदोन्नती देण्यात यावी. धनगर आरक्षणा संदर्भात नेमलेली टीस ही संस्था घटनाबाह्य असल्याने कृती समितीवर बंधन कारक नाही. शेळी मेंढी आर्थिक विकास महामंडळास एक हजार कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा. शेळ्या मेंढ्या चारण्यासाठी गायरान व वनविभागाच्या जमिनी उपलब्ध करून देण्यात याव्यात. अहिल्यादेवी मेष महामंडळा मार्फत समाजातील सुशिक्षित बेरोजगारासाठी पंचवीस लाख व्यवसायासाठी अनुदान देण्यात यावे. सैन्य व आदिवासी विकास विभागामध्ये लोकरीपासून बनवलेल्या घोंगड्या खरेदी करण्यात याव्यात. धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरु करावेत अशा मागण्या करण्यात आल्या होत्या. यावेळी तालुक्यातील धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी आरक्षण मिळण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी