शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नगर तालुक्यात अण्णांच्या समर्थनार्थ मोटारसायकल रॅली काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 21:56 IST

या आंदोलनाच्या समर्थनार्थ नगर तालुक्यातील खडकी, बाबुर्डी बेंद, खंडाळा, हिवरे झरे परिसरातील युवक व शेतकरी खडकी ते राळेगण सिद्धीपर्यंत शुक्रवारी मोटारसायकल रॅली काढणार आहेत.

केडगाव : शेतकऱ्यांचे प्रश्न, जनलोकपाल व लोकायुक्त नियुक्ती यांची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, यांसह विविध मागण्यांसाठी शुक्रवारपासून (दि. २३) ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे दिल्लीतील रामलीला मैदानावर आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या समर्थनार्थ नगर तालुक्यातील खडकी, बाबुर्डी बेंद, खंडाळा, हिवरे झरे परिसरातील युवक व शेतकरी खडकी ते राळेगण सिद्धीपर्यंत शुक्रवारी मोटारसायकल रॅली काढणार आहेत.अण्णा हजारे यांनी शेतीमालाला हमीभाव मिळावा, शेतक-यांना पेन्शन योजना लागू करावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, लोकपाल व लोकायुक्त यांची तत्काळ अंमलबजावणी यांसह विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. अण्णांच्या आंदोलनासाठी नगर तालुक्यातून उत्स्फूर्तपणे पाठिंबा मिळत आहे. आंदोलनाच्या समर्थनार्थ तालुक्यातील खडकी, बाबुर्डी बेंद, हिवरे झरे, खंडाळा येथील युवक व शेतकरी खडकी ते राळेगणसिद्धीपर्यंत मोटारसायकल रॅली काढणार आहेत. रॅली शुक्रवारी सकाळी ९ वाजता खडकीतून निघणार आहे. सारोळा कासार, अस्तगाव, वाळवणे, सुपामार्गे राळेगणसिद्धीला जाणार आहे.दरम्यान, अण्णांच्या आंदोलनाविषयी गावोगावी फिरून जनजागृती करणार आहे. आंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन युवक व शेतक-यांकडून करण्यात येत आहे. रॅलीमध्ये २०० पेक्षा अधिक मोटारसायकली घेऊन विद्यार्थी, तरुण व शेतकरी सहभागी होणार आहेत.

शनिवारी घंटानाद आंदोलन

विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आंदोलन करत आहेत. अण्णांच्या मागण्या तातडीने मान्य करव्यात. यासाठी सरकारला जागे करण्यासाठी खडकी, बाबुर्डी बेंद, खंडाळा येथील युवक व शेतकरी खडकी येथे घंटानाद आंदोलन करणार आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरanna hazareअण्णा हजारे