शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करीत सासू-सुनांचे दागिने ओरबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:26 IST

दुकान फोडून पैसे चोरले अहमदनगर : नगर-मनमाड रोडवरील एमआयडीसी परिसरात स्टीलचे दुकान फोडून चोरट्यांनी पाच हजार रुपये चोरून नेले. ...

दुकान फोडून पैसे चोरले

अहमदनगर : नगर-मनमाड रोडवरील एमआयडीसी परिसरात स्टीलचे दुकान फोडून चोरट्यांनी पाच हजार रुपये चोरून नेले. १३ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पप्पू दिनकर बडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक दाताळ हे पुढील तपास करीत आहेत.

बंद घराचे कुलूप तोडून पैसे, दागिने चोरले

अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. रविवारी (दि. १४) ही घटना घडली. या प्रकरणी मनोहर कोंडिबा भापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक फौजदार ताके हे पुढील तपास करीत आहेत.

सराफ दुकानातील दागिने चोरले

अहमदनगर : नेवासा तालुक्यातील निंभारी येथे चोरट्यांनी सोन्याचे दुकान फोडून ७७ हजार रुपयांचे सोने व चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना रविवारी (दि. १४) घडली. या प्रकरणी माउली नारायण डहाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भाटेवाड हे पुढील तपास करीत आहेत.

सोन्याची चेन चोरली

अहमदनगर : शहरातील गुलमोहर रोडवरील सावली सोसायटी येथील घरातून चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरून नेली. सोमवारी (दि. १५) ही घटना घडली. या प्रकरणी आनंदीबाई काशिनाथ आल्हाट यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक मोरे हे पुढील तपास करीत आहेत.