शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

जवानाकडून आईची हत्या

By admin | Updated: August 17, 2016 00:49 IST

सुपा : आईच्या नावावरील शेती वाटून देत नाही म्हणून पारनेर तालुक्यातील पिंपरी गवळी येथे लष्करी सेवेतील जवानाने जन्मदात्या आईची हत्या केली.

सुपा : आईच्या नावावरील शेती वाटून देत नाही म्हणून पारनेर तालुक्यातील पिंपरी गवळी येथे लष्करी सेवेतील जवानाने जन्मदात्या आईची हत्या केली. सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. जवानाचा पोलीस असलेला भाऊ जितेंद्र ऊर्फ हरिभाऊ केशव मांडगे (वय २६) याने फिर्याद दिली. पिंपरी गवळी येथे फिर्यादी जितेंद्र मांडगे, भारतीय लष्करात कारगील येथे सेवेत असणारा युवराज केशव मांडगे, आई ताराबाई केशव मांडगे व आजी अनुसया हराळ असे राहतात. वडिलांच्या निधनानंतर दोन्ही मुलांच्या नावावर तसेच आईच्या नावावर शेती वाटून देण्यात आली. आई ताराबाई मांडगे यांच्या नावावर असलेली ८ ते ९ एकर शेती लष्करी जवान युवराज वाटून मागत होता. प्रसंगी तो यावरून भांडत असे. १५ दिवसापासून युवराज सुट्टीवर आला होता. १३ आॅगस्ट रोजी संध्याकाळी आईने भाजी गरम वाढली नाही म्हणून त्याने भांडण केले व जेवण न करताच झोपला. १५ आॅगस्ट रोजी हरिभाऊ मांडगे कामावर गेला असता युवराज व आईत भांडण झाले व सकाळी ७ पासून आई घरात नसल्याचे मेहुणे प्रदीप रावसाहेब इथापे यांनी भ्रमणध्वनीवरून कळवले. शोधाशोध केल्यावर घरापासून ५० फूट अंतरावरील मळ्याच्या शेतात चेहऱ्यावर व गळ्यावर ओरखडल्याच्या जखमा, सुजलेला चेहरा व तोंडातून रक्तमिश्रीत द्रव असलेल्या ताराबाई मांडगे यांचा मृतदेह आढळून आला. युवराज केशव मांडगे यांनी जमीन वाटून देत नाही या कारणावरून वाद उकरून काढून तिला मारहाण करून ठार मारल्याचे जितेंद्र मांडगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांनी आरोपीस अटक केली.(वार्ताहर)