शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

आई-बाबा, पाखरांना भेटायला येणार ना?, वानखेडे बहीण-भावाची साद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 18:31 IST

'आम्हाला देवाने दुसरे आई बाबा दिले. पण ज्यांनी जन्म दिला, अशा आई बाबांना भेटायची इच्छा आहे. ते भेटले तर खूप आनंद होईल.  '

ठळक मुद्देपरभणी येथील मोतीराम वानखेडे व सोनाबाई वानखेडे यांनी चार वर्षांपूर्वी माया व कार्तिक या पोटच्या गोळ्यांना घारगाव (ता. श्रीगोंदा) येथील महात्मा फुले आश्रमशाळेत सोडले.आश्रमशाळेचे अध्यक्ष पोपटराव खामकर व त्यांच्या पत्नी रोहिणी यांनी या निराधार लेकरांना आई- बाबांची ऊब दिली.

- बाळासाहेब काकडे 

श्रीगोंदा (अहमदनगर): ‘आई बाबा... आम्ही सुखात आहोत. आम्ही शाळेत जातो. देवाने आम्हाला दुस-या आई-बाबांकडे ठेवले आहे. ते आमची काळजी घेतात. तुम्ही आम्हाला जन्म दिला! पण, तुम्ही आमच्या चिमुकल्या पाखरांच्या पंखात बळ येण्या अगोदरच आम्हाला सोडून दिले. आम्हाला तुमची खूप आठवण येते, पण तुम्हाला आम्ही कुठे शोधू? तुम्ही तुमच्या पाखरांना भेटायला येणार ना? सांगा ना आई बाबा..!’ परभणी येथील मोतीराम वानखेडे व सोनाबाई वानखेडे यांनी चार वर्षांपूर्वी माया व कार्तिक या पोटच्या गोळ्यांना घारगाव (ता. श्रीगोंदा) येथील महात्मा फुले आश्रमशाळेत सोडले. अन् नंतर पुन्हा या पोटच्या गोळ्यांचे काय झाले? याकडे ढुंकूनही पाहिले नाही. आश्रमशाळेचे अध्यक्ष पोपटराव खामकर व त्यांच्या पत्नी रोहिणी यांनी या निराधार लेकरांना आई- बाबांची ऊब दिली. पण जन्मदाते आई-बाबा आपणास कधी भेटतील याची आस या चिमुकल्यांना लागली आहे. वानखेडे दांपत्य घारगावातील गंगाराम खामकर यांच्या शेतात कामाला होते. माया सहा वर्षांची व कार्तिक वर्षांचा होता. त्यांना शिक्षणासाठी महात्मा फुले आश्रमशाळेत दाखल केले. परभणीला जाऊन येतो म्हणून हे दांपत्य गेले, ते पुन्हा माघारीच आले नाही. पोपट खामकर, गंगाराम खोमणे यांनी यांनी परभणीला जाऊन रमाईनगर परिसरात मोतीराम वानखेडे यांचा सलग दोन वर्षे शोध घेतला. पण वानखेडे दांपत्य सापडले नाही. माया आता चौथीला, तर कार्तिक दुसरीला आहे. 

आम्हाला देवाने दुसरे आई बाबा दिले. पण ज्यांनी जन्म दिला, अशा आई बाबांना भेटायची इच्छा आहे. ते भेटले तर खूप आनंद होईल.    - माया वानखेडे

माया व कार्तिक ही ईश्वराने आम्हाला दिलेली भेट आहे. आई वडील त्यांना आश्रमशाळेत सोडून गेले. पुन्हा माघारीच आले नाहीत. - पोपटराव खामकर, अध्यक्ष, महात्मा फुले आश्रमशाळा

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर