अहमदनगर : नगर- औरंगाबाद रोडवरील वांबोरी फाट्यापासून जवळ असलेल्या मल्हार गडावर मॉर्निंग ग्रुपने वर्गणीतून जमा झालेल्या पैशातून दहा फूट उंचीच्या तब्बल २५ नवीन वृक्षांची शनिवारी लागवड केली. मागीलवर्षी या ग्रुपने मल्हार गडावर ५५ दहा फुटी झाडांची लागवड केली होती.
मल्हार गडावरील वृक्ष लागवड मोहिमेत गोवर्धन शिंदे, शरद कराळे, नंदकुमार शिंदे, एकनाथ भगत, नामदेव दाणे, अरुण मोरे, साठे, बाळासाहेब दाणे, बबन भगत, अशोक शिंदे, साहेबराव तेलोरे, रामदास दाणे यांचा सहभाग आहे. वांबोरी रस्त्यावर हा गड आहे. या गडावर खंडोबाचे ऐतिहासिक मंदिर आहे. सपाटीपासून उंचावर असलेल्या या गडावर जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. गडाच्या पायथ्याशी वाहने उभी करून नागरिक पायी गडावर जातात. या परिसरातील ज्येष्ठ नागरिक दररोज सकाळी या गडावर मॉर्निंग वॉकसाठी येतात. त्यांनी वर्गणी करून पैसे जमविले. या पैशातून त्यांनी मागीलवर्षी गडावर दहा फूट उंचीची ५५ वडांची झाडे लावली. गडावर खडक असल्याने झाडे रोप नव्हती. या ग्रुपने जेसीबीच्या साहाय्याने खोल खड्डे घेऊन त्यात काळी माती टाकली. तसेच झाडे जगविण्यासाठी टँकरने पाणी घातले. त्यामुळे मागीलवर्षी सर्व झाडे वाढली आहेत. मागीलवर्षीची झाडे रोपल्याने यावही वर्षी मोठी दहा फुटाच्या झाडांची लागवड गडावर करण्यात आली आहे. त्यामुळे गडावरील निसर्ग सौंदर्यात आणखी भर पडली असून, नगरसह परिसरातील नागरिक या गडाला भेट देऊन निसर्गाचा आनंद घेत आहेत. या गडावरून पिंपळगाव माळवी, हरिश्चंद्र गड, हत्ती बाराव, यासह डोंगरदऱ्यांवरील धुके पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
.............
फोटो