शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंच्या इशाऱ्याने ५० टक्केहून अधिक कर्मचाऱ्यांची बदल्यातून माघार

By चंद्रकांत शेळके | Updated: May 10, 2023 21:51 IST

अहमदनगर : जिल्हा परिषद बदल्यांमध्ये सवलत घेण्यासाठी सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस आढळले तर थेट बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा ...

अहमदनगर : जिल्हा परिषद बदल्यांमध्ये सवलत घेण्यासाठी सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बोगस आढळले तर थेट बडतर्फीची कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिल्यानंतर कारवाईच्या भीतीने दोन दिवसांत ५० टक्क्याहून अधिक कर्मचाऱ्यांनी माघार घेत बदली घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अनेकांनी बोगस प्रमाणपत्र दिले होते, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, येरेकर यांच्या या क्रांतिकारक निर्णयाचे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमधून स्वागत होत आहे. 

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी बदल्यांमध्ये सवलत मिळण्यासाठी जी वैद्यकीय प्रमाणपत्रे जोडली आहेत, त्याची संबंधित कर्मचाऱ्यांनी १५ दिवसांत वैद्यकीय मंडळाकडून पडताळणी करून आणावी. तोपर्यंत बदल्यांचे आदेश तात्पुरते राहतील, असा पारदर्शी निर्णय जिल्हा परिषद बदल्यांमध्ये सीईओ आशिष येरेकर यांनी घेतला आहे. त्यामुळे बनावट प्रमाणपत्र सादर करणारे कर्मचारी धास्तावले असून त्यांनी गेल्या दोन दिवसांत बदल्यांमधून माघार घेतली आहे. विनंती बदलीसाठी आधी कागदपत्रे सादर केली, परंतु सीईओंच्या इशाऱ्यानंतर बदलीस नकार देणाऱ्यांचे हे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

बदलीसाठी सादर केलेले प्रमाणपत्र खोटे आढळले, तर थेट बडतर्फीची कारवाई होईल. त्यामुळे ज्यांनी असे प्रकार केले असतील, त्यांनी आताच ते कबूल करून बदली सवलतीचा हक्क सोडावा. हीच अखेरची संधी आहे, असा इशारा येरेकर प्रत्येक विभागाची बदली प्रक्रिया सुरू होण्याआधी देत आहेत. त्यामुळे बदल्यांतून माघार घेणाऱ्यांचे प्रमाण रोजच वाढत आहे. याचाच अर्थ बदल्यांसाठी मोठ्या प्रमाणात बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर झाले आहेत. ‘लोकमत’ने प्रारंभीपासून अशी बोगसगिरी झाली असल्याची शक्यता वर्तवली होती. त्यामुळे ‘लोकमत’च्या वृत्तावरही यानिमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे. येरेकर यांच्या निर्णयाचे स्वागत बदल्यांमधील वैद्यकीय प्रमाणपत्र त्रयस्थ यंत्रणेकडून पडताळणी करण्याचा सीईओ येरेकर यांनी घेतलेला निर्णय क्रांतीकारक आहे. त्यांच्या या निर्णयामुळे केवळ बोगसगिरीच उघड झालेली नाही, तर प्रामाणिक कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळाला आहे, असे म्हणत जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर