रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बोठे याने अटकपूर्व जामिनासाठी ७ डिसेंबर रोजी जिल्हा न्यायालयात ॲड. महेश तवले यांच्यामार्फत अर्ज सादर केला होता. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार होती. मात्र, पोलिसांनी सादर केलेले म्हणणे सविस्तर वाचून त्याचा अभ्यास करण्यासाठी वेळ हवा असल्याचे जिल्हा सरकारी वकील ॲड. सतीश पाटील यांनी न्यायालयात सांगितले. त्यामुळे सुनावणीची पुढील तारीख देण्यात आली. दरम्यान जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान बोठे याला न्यायालयात हजर राहण्यास सांगावे, असा अर्ज पोलिसांनी सरकारी वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात दिला आहे. आता यावर काय निर्णय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जरे यांच्या हत्येनंतर फरार झालेला बोठे अद्यापही पोलिसांना सापडलेला नाही. या गुन्ह्यातील पाच आरोपींना पोलिसांनी घटनेच्या दोन दिवसांनंतरच अटक केली. बोठे मात्र पोलिसांना का सापडेना, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाळ बोठेच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:37 IST