शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मोदी-ट्रम्प लोकशाहीचा गळा घोटताहेत : जयदेव डोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:30 IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पारंपरिक माध्यमांशी संवाद न साधता सोशल मीडियावर भिस्त ठेवून आपला अजेंडा राबवित आहेत, 

ठळक मुद्देसोशल मीडियाचा उत्पात समाजासाठी घातक

अहमदनगर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पारंपरिक माध्यमांशी संवाद न साधता सोशल मीडियावर भिस्त ठेवून आपला अजेंडा राबवित आहेत, हे कृत्य लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार आहे, असे मत माध्यमतज्ज्ञ प्रा़ जयदेव डोळे यांनी मंगळवारी ‘लोकमत संवादात’ व्यक्त केले.डोळे म्हणाले, सध्या संपूर्ण जगात सोशल मीडियाचा उत्पात सुरू आहे. फेसबूक, टिष्ट्वटर, व्हॉटस्अ‍ॅप या माध्यमांचे मालक परदेशात बसून पैसा कमवितात. त्यांचे फॉलोअर्स जितके जास्त तितका अधिक पैसा त्यांना मिळतो.आपले हित साधण्यासाठी विशिष्ट वर्गाकडून या माध्यमांचा वापर करून समाजात खोटे आणि चुकीचे पसरविले जात आहे. यातूनच दंगली घडतात. याउलट पारंपरिक माध्यमे आजही विश्वासपात्र आहेत. वर्तमानपत्रातून अफवा पसरविली म्हणून कधी कोणत्या संपादकाला शिक्षा झालेली नाही. मास मीडिया लोकशाहीला बळकट करण्याचे काम करतो तर सोशल मीडिया हा याच लोकशाहीला डळमळीत करत आहे. हा फरक समजून न घेता देशाचे प्रमुख जर सोशल मीडियावर भिस्त ठेवत असतील तर हे दुर्दैवी आहे. मोदी तर बोलतात एक आणि करतात भलतेच. त्यांचे मंत्री तर स्वत:चेच विधान वारंवार बदलून समाजाची दिशाभूल करत आहेत, असे सांगत डोळे म्हणाले, इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा वर्तमानपत्र हेच विश्वासपात्र आणि टिकाऊ माध्यम आहे. म्हणूनच समाज या माध्यमाकडे अपेक्षेने पाहतो. बातमी काय घडली यासह का घडली? याचे विश्लेषण येणेही गरजेचे आहे. पत्रकाराकडे विविध विषयांची माहिती असली तरी तिचा वापर कसा करावयाचा हे समजून घ्यावे. स्पर्धेच्या काळात चुकीची बातमी जाऊ नये, बातमीत नकळतपणे घडलेली चूकही समाजावर विपरित परिणाम करणारी ठरते असे डोळे म्हणाले.परदेशी मीडियातून वास्तव जगासमोरदिल्ली आणि मुंबईत परदेशी पत्रकारांची संख्या मोठी आहे. हे पत्रकार या देशातील गरिबी, महिलांचे शोषण, दलितांवरील अत्याचार, मानवी तस्करी, मीडियावरील हल्ले आदी विषय मांडतात़ ही विश्वासार्ह पत्रकारिता आहे़ परदेशी मीडियाच्या माध्यमातून देशातील हे चित्र जगासमोर जात असताना आपल्याकडील मोदी भक्त मात्र अवास्तव आणि कल्पित घटनांचा प्रसार आणि प्रचार करण्यात व्यस्त आहेत. यातून एक मोठी विसंगती निर्माण होताना दिसत आहे. आपल्याकडील स्थानिक माध्यमांनीही विविध विषयांवर संशोधन करून वेगवेगळे विषय लोकांसमोर मांडावेत. हे करताना समाजाची दिशाभूल होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे असे डोळे म्हणाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर