शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल चोरणाऱ्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:20 IST

दुकान फोडून कपडे चोरले अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील साकुर येथे चोरट्यांनी दुकान फोडून चोरट्यांनी २६ हजार ४०० रुपयांचे कपडे ...

दुकान फोडून कपडे चोरले

अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील साकुर येथे चोरट्यांनी दुकान फोडून चोरट्यांनी २६ हजार ४०० रुपयांचे कपडे चोरून नेले. ४ ते ५ फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात भागवत भाऊसाहेब डोमाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पैसे, दागिने चोरले

अहमदनगर: संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे चोरट्यांनी घरफोडी करून ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व राेख ५० हजार रुपये असा मुद्देमाल चोरून नेला. ५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात कारभारी रभा चकोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक जाधव हे पुढील तपास करत आहेत.

घरफोडी करून दीड लाखांचे दागिने चोरले

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंप्री रस्त्यावरील हातवळ येेथे चोरट्यांनी घरफोडी करून १ लाख ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ५ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विलास बलभीम कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे पुढील तपास करत आहेत.

घरातून दहा हजार चोरले

अहमदनगर: जामखेड तालुक्यातील पाडळी येथे घरातून चोरट्यांनी रोख दहा हजार रुपये चोरून नेले. ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अर्जुन महादेव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक भागवत हे पुढील तपास करत आहेत.