शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या दोघांना सांभाळण्याची कसरत

By admin | Updated: May 16, 2016 00:09 IST

अहमदनगर : महापौरपदाच्या निवडणुकीसाठी मनसेच्या दोन नगरसेवकांना सांभाळण्याची कसरत सभापती तथा पक्षाचे गटनेते गणेश भोसले यांना करावी लागत आहे.

अहमदनगर : महापौरपदाच्या निवडणुकीसाठी मनसेच्या दोन नगरसेवकांना सांभाळण्याची कसरत सभापती तथा पक्षाचे गटनेते गणेश भोसले यांना करावी लागत आहे. दोघांनाही स्थायी समितीचे सभापती पद पाहिजे असल्याचा अट्टाहास कायम असल्याने ते मिळाले नाहीतर काय? या प्रश्नामुळे सुवर्णा जाधव, विणा बोज्जा या दोन नगरसेविकेंच्या भूमिकेकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे. महापालिकेत मनसेचे चार नगरसेवक आहेत. त्यातील किशोर डागवाले यांनी सेनेत प्रवेश केल्यानंतर तिघे शिल्लक राहिले. गटनेते गणेश भोसले यांच्याकडे स्थायी समितीचे सभापतीपद आहे. फेब्रुवारी महिन्यातच त्यांच्या सभापती पदाची मुदत संपली. नगरसेविका सुवर्णा जाधव, विणा बोज्जा यांना सभापती पदाची आस लागून आहे. भोसले यांनी राजीनामा न दिल्याने हे पद त्यांना मिळू शकले नाही. भोसले यांच्या राजीनाम्यानंतरच सभापती पदाची निवडणूक होईल. महापौर पद निवडणुकीपूर्वी स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक झाली तर स्वपक्षातील नगरसेवक नाराज होतील, त्यातून सत्ता जाण्याची भिती असल्याने सत्ताधाऱ्यांनी निवडणूक न घेण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. मात्र, महापौर पद निवडणुकीपूर्वीच सभापती पद द्या, अशी मागणी जाधव व बोज्जा यांनी लावून धरली आहे. सभापती गणेश भोसले यांच्याशी यासंदर्भात त्यांची चर्चाही झाली, पण निर्णय न झाल्याचे सांगत भोसले यांनी वेळ निभावून नेली. वेळेत निवडणूक न झाल्यास आम्हाला गृहीत धरू नका, असे स्पष्ट करत जाधव, बोज्जा यांनी आपली भूमिकाच जणू काही स्पष्ट केली. या दोघांची मनधरणी करताना भोसले यांनाही कसरत करावी लागत आहे. (प्रतिनिधी)