श्रीरामपूर : राज्य सरकारने दर्शनासाठी मंदिरे त्वरित खुली करावी, यासाठी मनसेच्या वतीने येथे हनुमान मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.
जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी मंदिरासमोर जोरदार घंटानाद करून राज्य सरकारविरोधी घोषणाबाजी केली. बाबासाहेब शिंदे म्हणाले, सरकारने जनतेच्या श्रद्धेकडे साफ दुर्लक्ष केले आहे. मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करण्याची वेळ आणली आहे. अतिशय दुर्दैवी अशी ही गोष्ट आहे. हॉटेल तसेच दारूची दुकाने खुली असताना मंदिरे बंद करण्यामागील निर्णय अनाकलनीय आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या मोठमोठ्या सभा व कार्यक्रम खुलेआमपणे सुरू आहेत. तेथे कुठेही कोविडचे नियम पाळले जात नाहीत. केवळ मंदिराकरिता ताठर भूमिका घेतली जात आहे. तातडीने मंदिरे खुली केली नाहीत तर उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. राज्य सरकारला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागेल, असा इशारा शिंदे यांनी दिला. यावेळी जिल्हा सचिव तुषार बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, शहराध्यक्ष गणेश दिवसे, कामगार सेना उपचिटणीस नंदू गंगावणे, उदय उदावंत, राहुल दातीर, विकी राऊत, विशाल शिरसाठ, भास्कर सरोदे, नीलेश सोनवणे, गोरक्षनाथ येडे, शिवनाथ फोपसे, विष्णू अमोलिक, करण कापसे, ईश्वर जगताप, अमोल साबणे आदी उपस्थित होते.
-------
फोटो आहे : मनसे
शहरातील हनुमान मंदिरासमोर सरकारविरोधी घोषणा देताना मनसेचे पदाधिकारी.
-------