शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी पाच वर्षे वाया घालविली-प्रताप ढाकणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 12:35 IST

शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागाला पाटपाण्याची सोय करण्यासाठी आमदारकी पणाला लावू. शेतीला शाश्वत पाण्याची व्यवस्था झाल्याशिवाय शेतक-यांची भरभराट होणार नाही. मागील पाच वर्षे आमदारांनी वाया घालविली. फक्त भावनिक मुद्यावर जनतेला भुलविले, असा आरोप राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांनी केला.

शेवगाव : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागाला पाटपाण्याची सोय करण्यासाठी आमदारकी पणाला लावू. शेतीला शाश्वत पाण्याची व्यवस्था झाल्याशिवाय शेतक-यांची भरभराट होणार नाही. मागील पाच वर्षे आमदारांनी वाया घालविली. फक्त भावनिक मुद्यावर जनतेला भुलविले, असा आरोप राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांनी केला. शेवगाव तालुक्यातील सुळेपिंपळगाव, चेडेचांदगाव, अधोडी, शिंगोरी, राणेगाव, लखमापुरी, खामपिंप्री, पिंगेवाडी या गावांमध्ये ढाकणे यांनी प्रचार फेरी काढून ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.ढाकणे म्हणाले, बोधेगाव व परिसराला शेतीसाठी शाश्वत पाण्याची व्यवस्था व्हावी, अशी या भागातील ग्रामस्थांची मागणी आहे. जायकवाडी धरणातून पाट अथवा चारीद्वारे पाणी मिळूही शकते. आमदारांना पाच वर्षाच्या काळात या प्रश्नाला न्याय देण्यासाठी वेळ होता. परंतु त्यांनी काहीही केले नाही. उलट शेवगाव व पाथर्डी तालुक्याच्या पूर्व भागाला पाणी देण्याची मागणी करणाºयांची त्यांच्याकडून चेष्टा करण्यात आली. पाण्यासारख्या प्रश्नात लोकप्रतिनिधी जनतेची चेष्टा करणार असतील तर यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते? अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ढाकणे म्हणाले, त्यांना अपघाताने आमदारकी मिळाली. पाच वर्षाच्या काळात त्यांनी केवळ भावनिकतेचे राजकारण केले. ज्या पक्षाने त्यांना संधी दिली. त्या पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचे उद्योग त्यांनी केले. ज्या मुंडे साहेबांचे ते नाव घेतात, त्यांच्यासाठी व भाजपसाठी त्यांचे योगदान काय हे राजळेंनी सांगावे, असा प्रश्न त्यांनी केला.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019