शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावरून आमदार-महापौर आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 22:17 IST

अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्याच्या कामावरून आमदार संग्राम जगताप आणि महापौर सुरेखा कदम यांच्यात जुंपली आहे. राजकीय द्वेषापायी महापौरांनी आठ महिने रस्त्याचा प्रस्ताव महासभेच्या विषय पत्रिकेवर घेतला नसल्याचा आरोप आ. जगताप यांनी केला. तर विकास कामात अडथळे आणणारेच आंदोलने करीत आहेत. ४० कोटीचा गाजावाजा करणाºयांना महत्त्वाचा रस्ता करता आला नाही, हे दुर्दैव असल्याची टीका महापौरांनी आमदारांवर केली आहे.

अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील रस्त्याच्या कामावरून आमदार संग्राम जगताप आणि महापौर सुरेखा कदम यांच्यात जुंपली आहे. राजकीय द्वेषापायी महापौरांनी आठ महिने रस्त्याचा प्रस्ताव महासभेच्या विषय पत्रिकेवर घेतला नसल्याचा आरोप आ. जगताप यांनी केला. तर विकास कामात अडथळे आणणारेच आंदोलने करीत आहेत. ४० कोटीचा गाजावाजा करणाºयांना महत्त्वाचा रस्ता करता आला नाही, हे दुर्दैव असल्याची टीका महापौरांनी आमदारांवर केली आहे.जिल्हाधिकारी कार्यालय ते स्टेट बँक चौक ते चांदणी चौक ते नगर कॉलेज रस्त्याचे डांबरीकरण, मजबुतीकरण, रुंदीकरण आणि जलनिस्सारण व्यवस्था याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या बांधकाम विभागाने तयार करून नगरसचिवांकडे दिला होता. मात्र या प्रस्तावावर आठ महिन्यांपासून कोणतीही कार्यवाही झाली नाही. या रस्त्यासाठी निधी नसल्याने सदरचा रस्ता जिल्हा नियोजनमधून करण्याबाबतचे पत्र आ. संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले. त्यांनी सदरच्या प्रस्तावाला महासभेची मंजुरी घेऊन प्रस्ताव पुन्हा सादर करण्याबाबत दोनवेळा महापालिकेला पत्रव्यवहार केला. मात्र महापौरांनी जाणीवपूर्वक त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप करीत आ. संग्राम जगताप यांनी गुरुवारचे आंदोलन निश्चित केले होते. मात्र त्यापूर्वीच बुधवारी रात्री महापौरांनी सभेची तारीख निश्चित करून रस्त्याचा विषय मंजुरीसाठी घेतला. मात्र कोणतीही लेखी माहिती प्राप्त नसल्याने पूर्व नियोजनाप्रमाणे आंदोलन केल्याचे आ. जगताप यांनी सांगत महापालिकेच्या आवारात आंदोलन केले. यावेळी त्यांनी सत्ताधाºयांवर सडकून टीका केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भाषणांनी परिसर दणाणला.