शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

आमदार आदर्श गाव योजना कागदावरच

By admin | Updated: May 14, 2016 23:51 IST

अण्णा नवथर, अहमदनगर मतदारसंघातील किमान एक गाव दत्त घेऊन ते आदर्श बनविण्याची घोषणा सरकारने केली़ मात्र, सरकार योजनेबाबत उदासीन असून, वर्ष उलटूनही गावांचा विकास आराखडाच तयार होऊ शकला नाही़

अण्णा नवथर, अहमदनगरमतदारसंघातील किमान एक गाव दत्त घेऊन ते आदर्श बनविण्याची घोषणा सरकारने केली़ मात्र, सरकार योजनेबाबत उदासीन असून, वर्ष उलटूनही गावांचा विकास आराखडाच तयार होऊ शकला नाही़ विशेष म्हणजे याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना सरकारकडून न मिळाल्याने ही योजना कागदावरच असल्याचे चित्र आहे़सांसद आदर्शग्राम योजना केंद्र सरकारने सुरू केली़ त्याच धर्तीवर राज्य सरकारने आमदार आदर्श ग्राम योजनेची घोषणा केली़ तसे आदेश सरकारने जिल्हा प्रशासनास दिले़ गावे दत्तक घेण्यास विलंब झाल्याने आमदार टिकेचे धनी ठरले़ जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील आमदारांनी प्रत्येकाने एक गाव दत्तक घेतले़ दत्तक घेतलेल्या गावांतील कामांचा आराखडा तयार करणे, गावांना भेटी देऊन गावाची भौगोलिक परिस्थिती जाणून घेऊन तेथे कोणती कामे प्राधान्याने करता येतील, याचे नियोजन प्रशासनाकडून होणे अपेक्षित होते़ मात्र, तसे झाले नाही़ या गावांचे आराखडे तयार करण्यासाठी एकही बैठक प्रशासनाकडून घेतल्याचे ऐकीवात नाही़ त्यामुळे सरकारी उदासीनता आणि प्रशासन थंड, असेच काही आदर्श गाव योजनेचे झाले आहे़ आमदारांनी मात्र निवडलेल्या गावांना भेटी देऊन पायासुविधा निर्माण करणार असल्याचे जाहीर करून टाकले़ एवढेच नव्हे तर, यापुढे गावात एकही समस्या गावात राहणार नाही, असा संकल्प गावकऱ्यांसमक्ष केला़ मात्र, वर्ष उलटले तरी या गावांत भरीव अशी कामे झाली नाहीत़ त्यामुळे आमदारांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे़ स्थानिक निधीतून त्यांनी काही कामे केली़ पण, निधीअभावी कामांना मर्यादा येत आहेत़ सरकारकडून गाव आदर्श होईल, अशी अपेक्षा आमदारही बाळगून आहेत़ परंतु वर्ष उलटूनही सरकारदरबारी या योजनेबाबत काहीच हालचाली होताना दिसत नाहीत़ त्यामुळे निवडलेल्या गावांत आता आमदारही फिरकेनासे झाले आहेत़ गावात जावून गावकऱ्यांना सांगायचे काय, असा पेच त्यांच्याही समोर आहे़ केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना राबवून गावे आदर्श करण्याची ही संकल्पना आहे़ आमदार काय म्हणतात...सरकारकडून केवळ आदर्श गाव योजनेची घोषणा केली गेली़ मात्र, त्यासाठी नवीन निधी मिळाला नाही़ सरकारच्या ज्या योजना आहेत, त्यात त्रुटी असल्याने त्या निवडलेल्या गावात राबविणे अशक्य आहे़ त्यामुळे गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे़- वैभव पिचड, आमदारकेंद्र आणि राज्याच्या योजना निवडलेल्या गावात प्रभावीपणे राबविणे, ही या मागची संकल्पना आहे़ परंतु गावांच्या विकास कामांचा आराखडा अद्याप तयार झाला नाही़ आराखडा तयार करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे़- मोनिका राजळे, आमदारआमदारांनी ५० टक्के निधी खर्च केल्यानंतर सरकार तेवढाच निधी आदर्श गावासाठी उपलब्ध करून देणार होते़ परंतु याबाबत अद्याप कुठल्याही सूचना नसून, सरकारची ही योजना फसवी आहे़ - राहुल जगताप, आमदार