शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

आमदार जयकुमार गोरे विखेंच्या ताफ्यात ? संगमनेरात भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 18:51 IST

भाजप प्रवेशाच्या वाटेवर असलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्या समवेत भाजपमध्ये आणखी कोण आमदार प्रवेश करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

लोणी : भाजप प्रवेशाच्या वाटेवर असलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्या समवेत भाजपमध्ये आणखी कोण आमदार प्रवेश करणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी काँग्रेसचे माणखटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी राधाकृष्ण विखे यांची संगमनेरमध्ये अचानक भेट घेतली. विशेष म्हणजे संगमनेर ते आश्वी असा प्रवासही या एकाच गाडीत केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.दोनच दिवसापूर्वी सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी संगमनेरमध्येच भाजप प्रवेशाबाबत सूचक वक्तव्य करून काँग्रेसला धक्का दिला होता. राधाकृष्ण विखे जो निर्णय घेतील, त्यासोबत आम्ही राहू असे जाहीर वक्तव्य करून अन्य आमदारही प्रवेशासाठी तयार असल्याचे आमदार सत्तार यांनी बोलून दाखविले होते. याच पार्श्वभूमीवर विखे आणि आमदार गोरे यांची संगमनेरमध्ये झालेली भेट महत्वपूर्ण मानली जात आहे.मुंबईहून बुधवारी सकाळी विखे यांचे संगमनेर शहरात आगमन झाले. शहरातील व्यापाऱ्यांनी यावेळी विखे पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या स्वागत भेटीत राजकीय गप्पाही रंगल्या. त्यानंतर विखे व गोरे यांनी संगमनेर ते आश्वी दरम्यान एकाच गाडीतून प्रवास केला. या प्रवासात कोणती राजकीय खलबते झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे. असे असले तरी ही भेट काँग्रेसची चिंता वाढविणारी आहे. सत्तार आणि आमदार गोरे या दोघांनीही विखे यांची भेट घेण्यासाठी संगमनेरच का निवडले? याचीही चर्चा राजकीय गोटात आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलJayakumar Goreyजयकुमार गोरे