शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाविरोधात आमदार जगताप यांचा महावितरण कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 17:19 IST

अहमदनगर : शहरात होणारे भारनियमन रद्द करण्याचे आश्वासन न पाळल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी महावितरण कार्यालयात गेलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम ...

अहमदनगर : शहरात होणारे भारनियमन रद्द करण्याचे आश्वासन न पाळल्याने त्याचा जाब विचारण्यासाठी महावितरण कार्यालयात गेलेले राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना कोतवाली पोलिसांनी गुरूवारी ताब्यात घेतले. तत्पूर्वी भारनियमन रद्द व्हावे यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दोन तास महावितरण कार्यालयात ठिय्या दिला.शहरात गेल्या चार दिवसांपासून होत असलेले तातडीचे भारनियमन रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात मंगळवारी ठिय्या आंदोलन केले होते. तब्बल दोन तास वीज बंद करून कार्यालयात कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केल्याने अखेर महावितरणकडून गुरूवारपासून (दि. १४) भारनियमन रद्द करण्याचे लेखी आश्वासन आंदोलकांना मिळाले होते. त्यामुळे तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले.परंतु आश्वासनाप्रमाणे गुरूवारी भारनियमन रद्द न झाल्याने आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सकाळी साडेबारा वाजता कार्यकर्त्यांनी पुन्हा अधीक्षक अभियंता कार्यालठ गाठले व भारनियमन रद्द करण्याची मागणी करत ठिय्या दिला. या भारनियमनाची अंमलबजावणी राज्यस्तरावरून असून, स्थानिक अधिका-यांच्या हातात काहीही नाही. त्यामुळे भारनियमन रद्द करण्यास असमर्थ असल्याचे अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता जीवन चव्हाण आदींसह अधिका-यांनी सांगितले. परंतु आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवले. वाढती घोषणाबाजी व वातावरण चिघळण्याची स्थिती पाहून तेथे उपस्थित कोतवाली पोलिसांनी आ. जगताप यांना ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात आणले. त्यामुळे इतर आंदोलकांनीही त्यांच्यामागे कोतवाली पोलिसांत धाव घेतली. अर्ध्या तासानंतर जगताप यांनी सोडून देण्यात आले.