शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूर पालिकेचा चुकांचा अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:27 IST

यशवंतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मागील ...

यशवंतराव चव्हाण सभागृहात नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे, मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या उपस्थितीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मागील वर्षापेक्षा त्यात ५० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, अर्थसंकल्पातील आकडे फुगविले असल्याचे यावेळी झालेल्या चर्चेतून स्पष्ट झाले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मिल्लतनगर येथील साठवण तलावाच्या दुरुस्तीकरिता मुन्फ्रा या सरकारी संस्थेकडून पालिकेने चार वर्षांपूर्वी ५ कोटी रुपये कर्ज घेतले होते. मात्र, तलावाच्या कामाकरिता त्यापेक्षा अधिक खर्च अपेक्षित असल्याने हे पैसे तसेच पडून राहिले. या कर्जावर पालिकेला दरवर्षी २५ लाख रुपयांहून अधिक व्याज भरावे लागत आहे. पालिकेला दिल्या जाणाऱ्या चौदाव्या वित्त आयोगाच्या रकमेतून सरकार या पैशांची परस्पर कपात करत आहे. या सर्व व्यवहारांचा तपशील ताळेबंदात स्पष्टपणे सादर करण्यात आला नाही. त्यातील सव्वातीन कोटी रुपयांचा हिशेबच जुळला नाही. त्यामुळे विरोधक उपनगराध्यक्ष ससाणे, श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, मुजफ्फर शेख, भारती कांबळे, शामलिंग शिंदे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. स्वत: नगराध्यक्षा आदिक यांनीही यावर नाराजी व्यक्त केली.

यावर विरोधकांनी हा अर्थसंकल्प कोणी तयार केला, असा संतप्त सवाल उपस्थित केला. अधिकारी सभागृहाची दिशाभूल करत आहेत. मुख्याधिकाऱ्यांनीही अर्थसंकल्पाचा अभ्यास केलेला नाही, असा टोला त्यांनी लगावला. त्यामुळे अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करत सभेतून काढता पाय घेतला.

-----------

‘जंगल’ मालमत्ता

अर्थसंकल्पाच्या ताळेबंदात लेखाशीर्षमध्ये ‘जंगम’ मालमत्तेऐवजी ‘जंगल’ मालमत्ता हा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. मागील अर्थसंकल्पातील चूक यावेळीही गिरवण्यात आली. त्यामुळे अधिकाऱ्यांचा कारभार चव्हाट्यावर आला.

------------

अर्थसंकल्पाची प्रत दिली नाही

नगरसेवकांना दुरुस्ती केलेल्या अर्थसंकल्पाची प्रत देण्यात आली नाही. त्यामुळे सभा सुरू होताच नगरसेवकांनी त्यावर टीकेची झोड उठवली.

-----------