शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खोटे दागिने गहाण ठेवून बँकेला फसविले : श्रीरामपूर जिल्हा बँकेच्या दोन शाखांमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 11:39 IST

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या श्रीरामपूर येथील दोन शाखांमध्ये बँकेच्या व्हॅल्युअर व कर्जदारांनी संगनमताने खोटे दागिने गहाण ठेवून कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली.

श्रीरामपूर : अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या श्रीरामपूर येथील दोन शाखांमध्ये बँकेच्या व्हॅल्युअर व कर्जदारांनी संगनमताने खोटे दागिने गहाण ठेवून कर्ज उचलून बँकेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सराफासह २४ जणांविरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत मात्र बँकेची किती रुपयांची फसवणूक झाली याची निश्चित आकडेवारी समजू शकली नाही.बँकेचे शाखाधिकारी विलास कसबे (रा.शिरसगाव) यांनी शनिवारी सायंकाळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जिल्हा सहकारी बँकेच्या श्रीरामपूर शाखेत गोल्ड व्हॅल्युअर म्हणून रामेश्वर कचरु माळवे व शिवाजी रोड शाखेत अशोक कचरु माळवे हे दोघे बंधू काम पहात होते. शहर शाखेचे शाखाधिकारी ज्ञानदेव काळे यांच्या काळात १७ व शिवाजी रोड शाखेत शाखाधिकारी सदाशिव गोसावी यांच्या काळात ५ कर्जदारांनी सोनेतारण कर्ज घेतले. २२ जणांचे सोनेतारण कर्ज थकल्यामुळे बँकेच्या दोन्ही शाखांनी कर्जदारांकडून कर्ज वसुलीसाठी कार्यवाही सुरु केली. काही कर्जदारांनी कार्यवाहीनंतर कर्ज भरले.काहींनी कर्ज भरले नाही. त्यांना बँकेने नोटिसा पाठविल्या. ३० जानेवारी २०१९ ला सोने कर्जाच्या वसुलीसाठी दागिन्यांचा लिलाव पुकारण्यात आला. बँकेने पत्र देऊनही वरील माळवे गोल्ड व्हॅल्युअर अनुपस्थित राहिले. त्यामुळे लिलाव रद्द झाला. पुन्हा लिलाव पुकारण्यात आला. त्यावेळी दोघे अनुपस्थित राहिले. १० जानेवारी २०१९ रोजी नगरला बँकेच्या मुख्य कार्यालयात लिलाव झाला. यावेळी दागिन्यांच्या सर्व पिशव्या उघडण्यात आल्या. त्यातील दागिन्याच्या वजनात मोठी तफावत असल्याचे निष्पन्न झाले. गोल्ड व्हॅल्युअर व कर्जदारांनी संगनमताने बँकेची फसवणूक केल्याचे उघड झाले.प्रकरणी माळवे बंधू तसेच भारती प्रदीप करंडे, रेश्मा इसाक पटेल, लता प्रभाकर गोरे, असमा रिजवान शेख, संपत सावळेराम माने, खंडेराव सरोदे, सुनील खंडेराव सरोदे, कांचन अशोक माळवे, पल्लवी राजन माळवे, अभिषेक राजन माळवे, जितेश प्रकाश खैरे, राजेंद्र बबनराव आंबीलवादे, कैलास हुरे, ज्ञानेश्वर भास्कर सोनार, योगेश सुभाष चिंतामणी, लक्ष्मण पांडुरंग पटारे, शौकत साहेबखान पठाण, प्रकाश नारायण खैरे, राजेश भास्कर वाव्हळ, हेमंत अमृतलाल सोलंकी, सीमा अनिल आनंद यांच्याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे. माळवे बंधू गेल्या सहा महिन्यापासून फरार झाले आहेत. पोलीस त्यांच्या शोधात आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर