शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोविषयी गैरसमज पसरवू नयेत; डॉ. बी.एन.एस.मूर्ती, डॉ.अजित नवले यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:08 IST

अकोले : टोमॅटोवर आलेला रोग आणि कोविड-१९ याचा दुरान्वये कोणताही संबंध नाही. आजपर्यंत कोणत्याही वनस्पतीवरील विषाणूंचा परिणाम माणसावर होत नाही. कारण त्यांच्याकडे अशा संसर्गाचे रिसेप्टस नसतात, असा निर्वाळा देत टोमॅटोविषयी गैरसमज पसरू नये, असे आवाहन फलोत्पादन आयुक्त डॉ. बी.एन.एस.मूर्ती व माकप किसान सभेचे राज्य सचिव डॉ.अजित नवले यांनी केले आहे.

हेमंत आवारी / अकोले : तालुक्यात टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने पिक धोक्यात आले आहे. यात शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. मात्र टोमॅटोवर आलेला रोग आणि कोविड-१९ याचा दुरान्वये कोणताही संबंध नाही. आजपर्यंत कोणत्याही वनस्पतीवरील विषाणूंचा परिणाम माणसावर होत नाही. कारण त्यांच्याकडे अशा संसर्गाचे रिसेप्टस नसतात, असा निर्वाळा देत टोमॅटोविषयी गैरसमज पसरू नये, असे आवाहन फलोत्पादन आयुक्त डॉ. बी.एन.एस.मूर्ती व माकप किसान सभेचे राज्य सचिव डॉ.अजित नवले यांनी केले आहे. टोमॅटो बाधित करणा-या विषाणूची तपासणी व्हावी म्हणून फळ, पान आणि बियाणे बेंगलोरच्या इंडियन कौन्सिल अ‍ॅग्रीकल्चर रिसर्च (आयसीएआर) संस्थेकडे पाठविण्यात आले आहे. टोमॅटोवरील न्यू तिरंगा विषाणू असे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर डॉ. मूर्ती, डॉ. नवले यांनी शनिवारी याविषयी एका पत्रकाव्दारे हे आवाहन केले आहे. टोमॅटोला कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला हे राष्ट्रीय संशोधन संस्थांद्वारे फास्ट्राक मोडमध्ये शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. फळे खाण्यामुळे कोरोना विषाणूपेक्षा बरीच गुंतागुंत उद्भवू शकते? हे चुकीचे आहे. आजपर्यंत कोणत्याही वनस्पती विषाणूंचा परिणाम माणसावर होत नाही. कारण त्यांच्याकडे अशा संसर्गाचे रिसेप्टर्स नसतात. जगातील लोक आधीच तणावग्रस्त आहेत. त्यात गैरसमज होईल आणि शेतीचे नुकसान होईल, अशा बातम्या पसरवू नये असे पत्र फलोत्पादन आयुक्त डॉ.मूर्ती यांनी केले आहे.टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूजन्य आजाराचा संबंध मानवी आजाराशी जोडून काही जण अफवा पसरवत आहेत. संबंधितांनी हे प्रकार तातडीने थांबवावेत, असे आवाहन किसान सभा चे डॉ.नवले यांनी केले आहे. कृषी विभाग प्रयत्नशीलवनस्पती बाधक विषाणू व प्राणी बाधक विषाणू या संपूर्ण वेगवेगळ्या प्रजाती आहेत. वनस्पती किंवा टोमॅटोला बाधित करणा-या विषाणूमुळे माणसे आजारी पडण्याची घटना समोर आलेली नाही. टोमॅटोवर आलेल्या विषाणूमुळे माणसे आजारी पडल्याची बाब कोठेही घडलेली नाही. टॉमेटो पिकावर आलेल्या विषाणूची ओळख पटविण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे. निष्कर्षांची माहिती तातडीने सार्वत्रिक करून पिक रोगावरील उपचाराबाबत शेतक-यांना मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन किसान सभेचे डॉ.अशोक ढवळे, जे.पी.गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, डॉ.अजित नवले यांनी केले आहे.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्या