शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

दुचाकीचा आरसा केवळ केस विंचरण्यापुरताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:17 IST

अहमदनगर: दुचाकी चालविताना पाठीमागून येणारी वाहने दिसावीत तसेच रस्ता ओलांडताना वळून पाहण्याची गरज भासू नये यासाठी दुचाकीला दोन आरसे ...

अहमदनगर: दुचाकी चालविताना पाठीमागून येणारी वाहने दिसावीत तसेच रस्ता ओलांडताना वळून पाहण्याची गरज भासू नये यासाठी दुचाकीला दोन आरसे दिलेली असतात. बहुतांशी जण मात्र या आरशांचा उपयोग केवळ केस विंचरण्यासाठीच करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्तेअपघाताला इतर कारणांसह हेही एक कारण आहे. वाहतूक नियमानुसार मोटारसायकल प्रकारातील दुचाकीला दोन आरसे लावणे बंधनकारक आहे. यामुळे रस्त्यावरून चालताना मागील बाजूने उजवीकडून व डावीकडून येणारी वाहने दिसतात. या दोन्ही आरशांचा उपयोग केला तर अपघाताची शक्यता कमी असते. बहुतांशी जण विशषेत: तरुण केवळ फॅशन करायची म्हणून दुचाकीचे दोन्ही आरसे काढून टाकतात. काही जण एकच आरसा ठेवत आहेत. ज्यांच्या दुचाकीला आरसा आहे तेही उपयोग करताना दिसत नाहीत. रस्त्यावरून चालताना मागे वळून पाहतात आणि याचवेळी घडत असल्याचे वाहतूक विभागातील काही कर्मचाऱ्यांंनी सांगितले. विशेष म्हणजे आरसा न वापरणाऱ्या दुचाकीचालकांवर पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत.

दुचाकीचालकांना हे बंधनकारक आहे

दुचाकीला दोन आरसे असावेत तसेच चालकाकडे वाहन परवाना, कागदपत्रे, हेल्मेट, पोलूशनफ्री सर्टिफिकेट असावे तसेच वाहन क्रमांक व्यवस्थित वाचता येईल असा लिहिलेला असावा. बहुतांशी दुचाकी चालक या नियमांचे पालन करताना दिसत नाही. अशावेळी दंडात्मक कारवाईची तरतूद आहे.

बाईक फॅशन धोक्याची

कॉलेज तरुणांमध्ये असलेली बाईक फॅशनची क्रेझ लक्षात घेत बहुतांशी कंपन्यांनी मॉडर्न आणि स्टायलिश बाईक बाजारात आणल्या आहेत. अनेक तरुण या बाईकलाही आणखी मॉडिफाई करून घेतात. यामध्ये प्रथम आरसा काढला जातो. गर्दीतून सुसाट बाईक चालविणे या तरुणांना थ्रील वाटते. अशावेळी अपघात होण्याची जास्त शक्यता असते.

नियमानुसार दुचाकीला आरसा वापरणे बंधनकारक आहे तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे गरजेचे आहे. आरसा नसेल तर २०० रुपये दंडाची तरतूद आहे. बहुतांशी दुचाकीचालक मात्र आरसा वापरत नाहीत. येणाऱ्या काळात आरसा नसणे अथवा इतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.

- विकास देवरे, वाहतूक निरीक्षक अमदनगर शहर