आॅनलाईन लोकमतश्रीरामपूर, दि़ ९ - स्कूल बसमधून शाळेत येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस बसचालकाने फुस लावून पळविल्याची फिर्याद बस चालविरोधात शहर पोलिसात नोंदविली आहे़ मुलीच्या पालकांनी फिर्याद दिली़श्रीरामपूर शहरात सुतगिरणी परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस शहरातील एका स्कूलचा बसचालक अंकुश इथापे (रा.निपाणी वडगाव) याने फुस लावून पळवून नेले, अशी फिर्याद मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात दिली़ या घटनेची माहिती समजताच पोलीस उपअधिक्षक शिवखरे, पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे यांनी मुलीचे पालक, शाळेचे प्राचार्य आदींची भेट घेऊन चौकशी केली़ पुढील तपास हेड कॉन्स्टेबल उघडे हे करीत आहेत.
अल्पवयीन मुलीस बसचालकाने पळविले
By admin | Updated: June 9, 2017 14:25 IST