शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

नगरमध्ये अवघ्या दहा रुपयांत भरपेट जेवण: दररोज २०० जण घेतात या सेवेचा लाभ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:17 IST

नगरमध्ये मात्र काही संवेदनशील व्यापारी व सेवानिवृत्त सरकारी अधिकारी यांनी एकत्र येत हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुपमार्फत अवघ्या दहा रुपयांत भरपेट जेवण देणारी व्यवस्था सुरु केली आहे.

अरुण वाघमोडे/ अहमदनगर : विधानसभा निवडणूक काळात शिवसेना या राजकीय पक्षाने दहा रुपयांत जेवण देण्याची घोषणा केली होती़ या घोषणेची कधी अंमलबजावणी होते हे माहित नाही़ नगरमध्ये मात्र काही संवेदनशील व्यापारी व सेवानिवृत्त सरकारी अधिकारी यांनी एकत्र येत हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुपमार्फत अवघ्या दहा रुपयांत भरपेट जेवण देणारी व्यवस्था सुरु केली आहे. नवरात्रीपासून शहरातील प्रेमदान चौकात हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे़ हेल्पिंग हॅण्डस ग्र्रुपमार्फत अतिशय शुध्द, सात्त्विक व पौष्टिक असा सांबार भात, खिचडी-कढी अथवा पुलाव दहा रुपयांत दिला जातो़ या सेवेचा दररोज १५० ते २०० जण लाभ घेतात़ या उपक्रमासाठी अनेक जण स्वत:हून मदतीचा हात देवून या सेवेचा विस्तार होण्याच्या दृष्टीने योगदान देत आहेत.या उपक्रमासाठी राजेंद्र मालू यांनी स्वत:ची जागा देवून तेथे पत्र्याचे शेडही उभारुन दिले आहे. ग्रुपचे सदस्य वर्गणी जमा करून रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य आणतात. समाजातील काही दानशूर या उपक्रमासाठी मदत करीत आहेत़ तयार केलेले अन्न स्वच्छ प्लेटमध्ये सर्वांना उपलब्ध करून दिले जाते. लोकांना आरामशीर भोजन घेता येण्यासाठी येथे उंच टेबलचीही व्यवस्था केली आहे़ जेवणासोबत चवीसाठी लोणचेही दिले जाते. शनिवार वगळता आठवडाभर सकाळी ११ ते दुपारी १ यावेळेत हा उपक्रम सुरु असतो. यासाठी राजेंद्र मालू, महावीर कांकरिया, संगीता भोरे, संजय खोंडे, नाना भोरे, श्रीनिवास खुडे, नंदेश शिंदे, किशोर कुलकर्णी, अपर्णा खुडे, प्रा़मुंडके यांच्यासह अनेक जण या उपक्रमात स्वयंस्फूर्तीने मदत करतात. प्रत्येक जण वेळे मिळेल त्याप्रमाणे या केंद्रावर येवून जबाबदारी सांभाळत आहे़     गरिबांसाठी आधार प्रेमदान चौक परिसरात अनेक हॉस्पिटल्स असून याठिकाणी परगावचे रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत असतात. या उपक्रमामुळे सर्वसामान्यांची कमी पैशांत चांगली व्यवस्था झाली आहे़ हातावर पोट असणारे, मजूर, बेघर, अनाथ यांच्यासाठीही हे केंद्र आधार ठरले आहे़ 

 भुकेलेल्या अन्न व तहानलेल्या पाणी देणे हिच खरी माणुसकी असल्याची शिकवण भारतीय संस्कृतीची महानता आहे. आज एकीकडे अन्नाची प्रचंड नासाडी तर दुसरीकडे आर्थिक क्षमता नसल्याने एक वेळच्या अन्नालाही महाग असलेले लोक आपण पाहतो. या विदारक परिस्थितीवर केवळ चर्चा करण्यापेक्षा आम्ही काही लोकांनी एकत्र येत दहा रुपयांत सकस अन्न देण्याचा उपक्रम सुरू केला आहे़ नगरकरांनाही या उपक्रमात सहभागी व्हावे़ आपले वाढदिवस किंवा संस्मरणाच्या क्षणी या केंद्राला मदतीचा हात देवून ते या सेवेच्या विस्तारात योगदान द्यावे़ -महावीर कांकरिया, सदस्य- हेल्पिंग हॅण्डस फॉर हंगर्स ग्रुप.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरhotelहॉटेल