शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ‘कृषी समृद्धी’ योजना राबविणार ; जुन्या योजनेत गैरप्रकार, नवी पीकविमा योजना लागू 
2
संतापजनक! प्राध्यापक व्हिडिओसह ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार करत होता; तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
3
आजचे राशीभविष्य, १६ जुलै २०२५: 'या' राशीच्या लोकांना नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होईल
4
"माझी इच्छा नव्हती पण मला फाशी घ्यायला भाग पाडलं"; सोलापूरातील तरुणाने चिठ्ठी लिहून आयुष्य संपवलं
5
पहलगाममध्ये २६ जणांना ठार मारल्यानंतर दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला, प्रत्यक्षदर्शीने केला मोठा खुलासा
6
संपादकीय: बहिणींसाठी भावांना चुना; सरकारला पैसा हवा, मद्यावर कर वाढवला...
7
नाही-नाही करत अखेर जयंत पाटील यांचा राजीनामा; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष
8
वेलकम बॅक शुभांशू... चारही अंतराळवीरांचे पृथ्वीवर सुखरूप आगमन
9
बिस्किटांच्या बॉक्समधून ६० कोटींच्या कोकेनची तस्करी; भारतीय महिलेला अटक
10
खासदारांचे बाष्पस्नान, ‘हॉट स्टोन’ मालिश आणि ‘डीटॉक्स’
11
धक्कादायक! एक कोटी १२ लाख एसआयपी बंद म्हणजे बंदच...; का पैसे काढून घेतायत लोक...
12
दिलासा देणारी बातमी...! वर्षाला ५ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांच्या कमाईत वाढ
13
झोपडपट्टी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून गदारो‌ळ, मंत्री देसाई अन् ठाकरे-सरदेसाईंमध्ये खडाजंगी
14
आर्थिक गंडा घातल्यास दंडही वाढेल अन् वसुलीही होईल; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधानसभेत घोषणा
15
२०२९ चा ‘मुहूर्त’ धरून ‘तुलसी’ का परत येते आहे?
16
भाजप आमदारांची मागणी भाजपच्याच मंत्र्यांनी लावली धुडकावून; बाजार समितीवरून झाला खेळ...
17
२३ वर्षांपूर्वीच्या कांदा धोरण समितीच्या अहवालाचे काय?
18
बोगस डॉक्टर, पॅथलॅबप्रकरणी कायद्यासाठी लवकरच समिती; नगरविकास राज्यमंत्री  मिसाळ यांची घोषणा
19
कुत्र्यांना तुमच्या घरी का खाऊ घालत नाही? याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
20
सावत्र बापाने घात केला, बेपत्ता चिमुरडीचा मृतदेह सापडला ससून डाॅक समुद्रात 

परतीच्या पावसाने बाजरी काळी पडली; कांदा रोपे भुईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 15:36 IST

अवेळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांची पुरती वाट लागली आहे.  

दिनेश जोशी । दहिगाव बोलका : मागील तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी झालेला पाऊस समाधानकारक असला तरी अवेळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांची पुरती वाट लागली आहे.      नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण झालेले असले तरी शासकीय आदेशानुसार एका शेतकºयाच्या केवळ दोन हेक्टरपर्यंतच नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत. नुकसानीपेक्षा कमी क्षेत्राचे पंचनामे झाले आहेत. दहिगावातील  विमाधारक २७५ तर बिगर विमाधारक ३८७ शेतकºयांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. विमाधारक शेतकºयांच्या १९५.७२ हेक्टरमधील सोयाबीन १७४.५४ हेक्टर, बाजरी ११.२१ हेक्टर, कपाशी ९.९५ हेक्टर या पिकांचे पंचनामे झाले आहेत. बिगर विमाधारक शेतकºयांचे सोयाबीन ११९.२६ हेक्टर, मका १०८.६० हेक्टर, कपाशी २९.२८ हेक्टर, बाजरी ३४.०९ हेक्टर, तर कांदारोप ४.०९ हेक्टर असे २९३.३२ हेक्टर क्षेत्रावरील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे झाले आहेत. दहिगाव बोलका मंडलात २०१६ साली २३६ मिमी, २०१७ साली ४५५मिमी तर २०१८ साली २३६ मिमी तर यावर्षी ४८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीचा पाऊस २०१७ पेक्षा जास्त झाला असला तरी तो अवेळी झाला आहे. सोयाबीन सारख्या पिकाची वेळेवर सोंगणी न झाल्याने त्याच्या शेंगा फुटतात. सोंगलेल्या पिकांच्या शेंगामधील दाण्यांना मोड फुटतात, अशा प्रकारे सोयाबीन पिकाचे झालेले नुकसान जास्त आहे. मळलेली सोयाबीन काळी पडल्याने भाव निम्म्याने कमी झाले आहेत. मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव यावर्षी मोठ्या प्रमाणात होता. ऐन सोंगणीच्या वेळी पावसाचा तडाखा बसल्याने मका पिकाचा चारा खराब झाला. सोंगूण ठेवलेल्या कणसांना मोड फुटले होते. कपाशी पिकात पावसाचे पाणी साचल्याने झाडे कुजून गेली तर कापसाची बोंडे गळून पडली. बाजरी काळी पडली असून उग्र वास येत आहे.  उन्हाळा हंगामासाठी टाकलेली कांद्याची रोपे अती पावसाने व त्यानंतर आलेल्या धुईने भुईसपाट झाली आहेत. 

‘दीड एकर बाजरी आजही वावरात उभी असून कणसे पूर्णपणे काळी पडली आहेत. आता ते पीक वावराबाहेर काढण्यासाठी घरातून पैसे घालावे लागतील, असे दत्तात्रय देशमुख यांनी सांगितले. 

मी ७ एकरात सोयाबीनचे पीक घेतले होते. परंतु अवेळी झालेल्या पावसाने सोयाबीनचे दाणे पूर्णपणे काळे पडले आहेत, असे शेतकरी बाळासाहेब वलटे यांनी सांगितले.

टॅग्स :FarmerशेतकरीCrop Insuranceपीक विमा