शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दूध आंदोलन पेटले : स्वाभिमानीच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 13:58 IST

दुध संघांनी दूध संकलन बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान स्वाभिामनीचे उत्तर जिल्हाध्यक्ष रविंद मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांना शिर्डी पोलिसांनी पहाटेच ताब्यात घेतले आहे.

अहमदनगर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या दूध बंद आंदोलनाला नगर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील प्रमुख दुध संघांनी दूध संकलन बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दिला. दरम्यान स्वाभिामनीचे उत्तर जिल्हाध्यक्ष रविंद मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांना शिर्डी पोलिसांनी पहाटेच ताब्यात घेतले आहे.दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी दूध बंद आंदोलनाची हाक देण्यात आली. रविवारी मध्यरात्रीपासूनच कार्यकर्त्यांनी बड्या शहरांकडे जाणारे दुधाचे टँकर रोखण्याची तयारी केली होती. पोलिसांनी माहामार्गांवर ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उत्तर नगर जिल्ह्यातील दूध आंदोलनाचे नेतृत्व राहुरी येथील रविंद्र मोरे करत आहेत. दक्षिण नगर जिल्ह्याची जबाबदारी बाळासाहेब लोंढे यांच्याकडे आहे. उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष मोरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रविवारी मध्यरात्री शिर्डी येथे जावून साईबांबांना दुधाचा अभिषेक घालत आंदोलनाला प्रारंभ केला. मात्र मोरे यांच्यासह दिनेश वराळे, अरुण डौले, किशोर वराळे, अजिनाथ वरघुडे यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबध्द केले. पाथर्डी तालुक्याचे अध्यक्ष शरद मरकड यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, दूध आंदोलनाला संकलन बंद ठेवून दूध संघांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण दूध संकलन बंद आहे़ दूधाचा एकही टँकर रस्त्यावर दिसत नसल्याचे प्रकर्षाने जाणवले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरmilkदूध