अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुरुवारी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले.
संगमनेर तालुक्यातील मंगळापूर गावात दगडाला दुधाचा अभिषेक घालत आंदोलन करण्यात आले. ॲड. दीपक वाळे, सोमनाथ भोकनळ, भानुदास गोरे, रमेश पवार, समीर वाळे, शिवाजी वाळे, राधू भोकनळ, आदी या आंदोलनात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांनी रस्त्यातच मोठा दगड मांडून त्याला दुधाचा अभिषेक घालत सरकारचा निषेध केला. यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी येथे डॉ. कृषिराज टकले व सल्लागार नवनाथ वाघ यांनी ढवळेवाडी, ता. पाथर्डी यथे दुधाने अंघोळ करून आंदोलन केलेे.
...........
या आहेत मागण्या
लॉकडाऊनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांची सहकारी व खासगी दूध संघांकडून लूटमार करण्यात आली. लॉकडाऊन काळात मागणी घटल्याचे कारण देत दूध संघांनी दूध खरेदीचे दर १० ते १५ रुपये प्रती लिटरने पाडले; मात्र ग्राहकांसाठी विक्रीदर तसेच ठेवत शेतकरी व ग्राहकांची प्रचंड लूटमार केली आहे. ज्या दूध संघांनी दूध खरेदीचे दर पाडले, त्या सर्व दूध संघाचे ऑडिट करा. तसेच दूध संघावर कठोर कारवाई करावी. दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी एफआरपी व शिल्लक मिळकतीत हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरिंग असे कायदेशीर दुहेरी संरक्षण करावे, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
................
१७ दूध आंदोलन संगमनेर
ओळ : संगमनेर तालुक्यातील मंगळापूर गावात दगडाला दुधाचा अभिषेक घालण्यात आला.
..............
१७ दूध आंदोलन पाथर्डी
पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी येथे दुधाने अंघोळ करून आंदोलन करताना कृषिराज टकले, नवनाथ वाघ.