शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मका पिकावर लष्करी अळीचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 12:00 IST

खोडकीडा वगळता अन्य रोग व अळी माहीत नसलेल्या राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरातील मका, चारा पिकांवर लष्करी अळीचा अ‍ॅटॅक झाल्याने मका उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.

माया हापसेब्राह्मणी : खोडकीडा वगळता अन्य रोग व अळी माहीत नसलेल्या राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी परिसरातील मका, चारा पिकांवर लष्करी अळीचा अ‍ॅटॅक झाल्याने मका उत्पादक शेतकरी चांगलाच धास्तावला आहे.दुष्काळी परिस्थितीत पशुपालन वाचविण्यासाठी कमी पाण्यात व अल्पावधीत येणारे चारा पीक म्हणून मकाचे उत्पादन अधिक प्रमाणात होत आहे. यापूर्वी मका पिकांवर खोडकीडा वगळता अन्य रोग व अळी पडल्याचे कधी इतिहासात दिसून आले नाही. मात्र, कपाशीवरील बोंडअळी अन् उसावरील हुमणीअळी पाठोपाठ आता ऐन दुष्काळात मका, चारा पिकावर स्पोडपटेरा अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी आर्थिक झळ बसत आहे. मका हे कमी खर्चातील पीक असल्याने सर्वसामान्य शेतकºयांनी यंदा दुष्काळ परिस्थितीमुळे चारा पिकांचे पैसे होईल. या उद्देशाने ऊस तोडून मकाला प्राधान्यक्रम दिला. मात्र,कधी नव्हे ते अचानक आलेल्या स्पोडपटेरा अळीने मका उत्पादक शेतकºयांची झोपच उडाली आहे. अळीचा प्रादुर्भाव इतका भयानक आहे, की दोन-तीन वेळा औषध फवारणी करूनही अळी आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आणखी आर्थिक अडचणीत येत आहे. एवढे करूनही समाधानकारक पीक आणूनही पिकाला हमीभाव नाही. त्यामुळे शेतकरी सुधारण्याऐवजी आणखी डबघाईस आल्यास नवल वाटायला नको, हे निश्चित.भविष्यातील चारा टंचाईला सामोरे जाण्यासाठी मुरघास या आधुनिक पद्धतीने चारा निर्मितीसाठी मका पिकांना यंदा अच्छे दिन आले असतानाच लष्करी अळीने थैमान घातल्याने ब्राह्मणीसह राहुरी तालुक्यातील हजारो हेक्टरवरील मकाचे पीक धोक्यात सापडले आहे. दरवेळी सर्व बाजूंनी अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकºयांना सावरण्यासाठी आता कृषी विभाग व सरकारनेच आधार द्यावा.दक्षिण भारतात यापूर्वी खरिपात आलेली लष्करी अळी आपल्या परिसरात यंदा प्रथमच रब्बीत आली आहे. ती गत आठवड्यापासून अधिक दिसून येते. वाढीदरम्यान मका पिकाच्या पोग्यावर प्रथम अंश दिसतो. तत्काळ लक्ष न दिल्यास परिणामी प्रमाण वाढते. अळी नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस प्रति लिटर २ मिली प्रथम फवारणी करावी. प्रादुर्भाव आटोक्यात न आल्यास कोराजनची फवारणी करावी. - शिवप्रसाद कोहकडे, कृषी सहाय्यक, ब्राह्मणी.नांगरट, रोटा मारून लहान ट्रॅक्टरद्वारे अर्धा एकर मका पेरणी केली. मशागत, बियाणे, दोनदा औषध फवारणी केली. एकूण खर्च सात हजार रुपये झाला. मात्र,अळी अद्याप कमी झालेली नाही. त्यामुळे पीक वाया गेले आहे. -बापूसाहेब काशिनाथ हापसे, नुकसानग्रस्त शेतकरी, ब्राह्मणी.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर