शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

म्हारी छोरीया छोरोंसे कम है के?

By admin | Updated: April 5, 2017 12:58 IST

कुस्त्यांच्या आखाड्यात आता मुलीही दंड थोपटून मैदान मारत आहेत. कोणी भावाकडून, तर कोणी वडिलांकडून कुस्तीच्या डावपेचांचा अभ्यास करून ‘हम किसीसे कम नही,’ असा नारा देत आहेत.

आॅनलाईन लोकमतयोगेश गुंड / अहमदनगर, दि़ ४ -गावोगावी होणाऱ्या जत्रेत रंगत आणणाऱ्या कुस्त्यांचा हगामा आता फक्त पैलवानकी करणाऱ्या मुलांची मक्तेदारी राहिला नाही. नुकत्याच आलेल्या ‘दंगल’ चित्रपटामुळे अन् त्यातील ‘म्हारी छोरीया छोरोंसे क्या कम है’’? या डॉयलॉगमुळे तर सारा माहोल बदलून गेला आहे. कुस्त्यांच्या आखाड्यात आता मुलीही दंड थोपटून मैदान मारत आहेत. कोणी भावाकडून, तर कोणी वडिलांकडून कुस्तीच्या डावपेचांचा अभ्यास करून ‘हम किसीसे कम नही,’ असा नारा देत आहेत.कुस्ती म्हटले, की मुलांची मक्तेदारी मानली जाते. पण आता ही मक्तेदारी इतिहास जमा होत आहे. कारण सध्या गावोगावी रंगणाऱ्या कुस्त्यांच्या हगाम्यात मुलीही दंड थोपटून कुस्त्या खेळून ‘दंगल’ चित्रपटाचा प्रभाव ग्रामीण भागातील मुलींच्या मनावर किती खोलवर झाला आहे, याची प्रचिती देत आहे. नगर तालुक्यात जत्रा झाली, की दुसऱ्या दिवशी गावात कुस्त्यांचा आखाडा भरतो. आता या आखाड्यात मुलांबरोबरच मुलीही कुस्ती खेळण्यासाठी लाल मातीच्या मैदानात उतरत आहेत.सारोळा कासार येथील जत्रेच्या हगाम्यात ६ मुलींनी कुस्त्या खेळून गर्दीला अचंबित केले.मुलीसुद्धा मुलांप्रमाणे कुस्तींचे मैदान गाजवू शकतात, यावर क्षणभर कोणाचा विश्वासही बसत नव्हता.इतर गावांतील कुस्तीच्या हगाम्यातही मुली कुस्ती खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.पैलवानकी करणाऱ्या मुलांना लागणारा खुराक आता मुलींसाठी बनवला जात आहे.सारोळा कासार येथील प्रज्ञा सुखदेव साळवे हिने नुकतीच दहावीची परीक्षा दिली.तिचा भाऊ बुद्धभूषण पैलवान आहे.त्यानेच आपल्या बहिणीला कुस्तीमधील डावपेच शिकून कुस्तीसाठी तयार केले. प्रज्ञाने शालेय कुस्ती स्पर्धेचे मैदानही गाजवले आहे. ती नगर तालुक्यात प्रथम आली. आठवीत असल्यापासून ती कुस्तीचे धडे गिरवत आहे.रोज आपल्या भावासोबत ती कुस्तीचा सराव करत आहे.याच गावातील आदिती राजू धामणे ही नववीमध्ये शिकत असून, तिलाही आपला भाऊ आदित्य हा कुस्तीचे डावपेच शिकवत आहे.वडील शेतकरी आहेत.आदितीला कुस्तीत नावलौकिक मिळवायचा आहे.चिचोंडी पाटील येथील धनश्री इंगळे व ऋतुजा इंगळे या दोन्ही बहिणी शाळा शिकून आपले वडील सुनील इंगळे यांच्याकडून कुस्ती शिकत आहेत.गेल्या चार वर्षांपासून या दोघी बहिणी गावोगावी होणाऱ्या हगाम्यात सहभागी होऊन कुस्त्यांचे मैदान गाजवत आहेत. मोठी बहीण कोमलसुद्धा राज्यपातळीवर कुस्ती खेळली आहे.आता धनश्री व ऋतुजा यांनीही कुस्तीत करिअर करायचे आहे. प्रज्ञाने शालेय कुस्ती स्पर्धेचे मैदानही गाजवले आहे. ती नगर तालुक्यात प्रथम आली. आठवीत असल्यापासून ती कुस्तीचे धडे गिरवत आहे.रोज आपल्या भावासोबत ती कुस्तीचा सराव करत आहे.याच गावातील आदिती राजू धामणे ही नववीमध्ये शिकत असून, तिलाही आपला भाऊ आदित्य हा कुस्तीचे डावपेच शिकवत आहे. वडील शेतकरी आहेत.